21 May 2024 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
x

केजरीवालांवर हल्ल्याचा कट? तरुणाकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस

नवी दिल्ली : दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काही दिवसांपूर्वी कार्यालयाजवळ धक्काबुक्की करत एका इसमाने मिरची पूड फेकल्याचं असफल प्रयत्न केला होता. ते संपूर्ण प्रकरण ताज असताना आत केजरीवालांच्या जनता दरबारातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने त्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करून चौकशी सुरु केली आहे.

तसेच हाती आलेल्या वृत्तानुसार, वय वर्ष ३९ असलेल्या मोहम्मद इमरान नामक इसमाने नक्की काय डाव आखला होता त्याची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. तपासणीदरम्यान सुरक्षे रक्षकांना त्याच्या खिशात जिवंत पिस्तुल गोळी सापडली आणि त्याठिकाणी एकच खळबळ उडाली. त्याच्यासोबत १२ अन्य इमाम आणि मौलवी सुद्धा उपस्थित होते.

हे सर्व लोकं दिल्ली वक्फ बोर्डमधील कर्मचाऱ्यांची खोळंबलेली पगारवाढ करावी अशी शिफारस करण्यासाठी केजरीवालांच्या जनता दरबारात गेले होते असे वृत्त आहे. परंतु, या प्रकरणामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न चिन्हं उपस्थित होत आहेत.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x