16 March 2025 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bima Sakhi Yojana l दहावी पास महिलांना दरमहा 7000 रुपये मिळणार, या खास सरकारी योजनेसाठी अर्ज करा Yes Bank Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या खाली घसरणार येस बँक शेअर्स, तज्ज्ञांचा सल्ला - NSE: YESBANK Gratuity Money l 90% पगारदारांना माहित नाही किती ग्रॅच्युइटी मिळते, इथे समजून घ्या आणि नुकसान टाळा EPFO Money Alert l खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, खात्यात EPF चे 1,17,82,799 रुपये जमा होणार Budh Vakri Rashifal l यापैकी तुमची राशी कोणती, बुधाची वक्री चाल 'या' राशींना प्रचंड लाभ मिळवून देणार Horoscope Today | 16 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी रविवारचा दिवस, तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 16 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Post Office FD Scheme | पोस्टाची जबरदस्त एफडी योजना; केवळ 5 वर्षांत धन दुप्पट, उत्तम बचत योजनेचा लाभ घ्या

Post Office FD Scheme

Post Office FD Scheme | उत्तम बचतीसाठी गुंतवणूक हा एकमेव मार्ग आहे. बऱ्याच व्यक्ती आपल्या बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात. आता योग्य ठिकाण कोणतं तर, काही व्यक्तींना जोखीम घ्यायला आवडते त्यामुळे असे लोक थेट शेअर बाजारात गुंतवणूक करतात.

परंतु असेही काही लोक आहेत ज्यांना आपण बचत केलेल्या पैशांची सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करून जोखीममुक्त परताव्याचा लाभ मिळावा अशी इच्छा असते. अशा व्यक्तींसाठी पोस्ट ऑफिसच्या सरकारी योजना फायद्याच्या ठरू शकतील.

आज घ्या बातमीपत्रातून आम्ही तुम्हाला पोस्टाच्या एफडी योजनेविषयी माहिती सांगणार आहोत. ही योजना 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी येते. दरम्यान योजना बँकेच्या एफडी योजनांपेक्षा चांगले व्याजदर प्रदान करते. सध्याच्या घडीला पोस्टाची एफडी योजना आपल्या ग्राहकांना 7.5% दरानुसार व्याजदर उपलब्ध करून देत आहे. भरीव परतावा कसा मिळेल इथे पहा.

एक रक्कमी पैसे गुंतवा आणि आकर्षक व्याजदर मिळवा :
पोस्टाच्या 5 वर्षांच्या एफडी योजनेमध्ये तुम्ही एकदाच पैसे गुंतवून आकर्षक व्याजदराचा लाभ उचलू शकता. भविष्याचा विचार करून तुम्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 5 वर्षांचा हिशोबाने एक ठराविक रक्कम गुंतवली तर, तुम्हाला चांगले व्याजदर मिळेल. पोस्टाची एफडी योजना एका वर्षासाठी 6.9%, दोन वर्षांसाठी 7%, तीन वर्षांसाठी 7%, चार वर्षांसाठी 7.5% आणि पाच वर्षांसाठी देखील 7.5% दराने व्याजदर प्रदान करते.

समजा तुम्ही पोस्टाच्या एफडी योजनेमध्ये 7 लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर, प्रत्येक वर्षाच्या व्याजदराप्रमाणे किती निश्चित परतावा मिळणार :
1. एका वर्षाचे व्याजदर 6.9% आहे. समजा एखाद्या व्यक्तीने पोस्टाच्या एफडी योजनेमध्ये 1 वर्षाच्या कालावधीसाठी 7 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर, त्याला 7,49,564 रुपये परत मिळतील.

2. दोन वर्षांच्या पोस्टाच्या एफडी योजनेमध्ये 7 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास 7% व्याजदरानुसार 8,04,217 रुपये परत मिळतील. म्हणजेच 1 लाखांपेक्षा जास्त रक्कम केवळ व्याजाने मिळेल.

3. पाच वर्षांच्या पोस्ट ऑफिस एफडीमध्ये एकदा 7 लाख रुपयांची रक्कम गुंतवली आणि 7.5% व्याजदर मिळविले तर, 10,14,964 रुपयांचा परतावा मिळेल. यामधील 3 लाखांपेक्षा अधिक रक्कम केवळ व्याजाने कमावलेली असेल.

महत्त्वाचं :
समजा एखाद्या व्यक्तीला आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पोस्टाच्या एफडीमध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल परंतु मुलाचे वय 10 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याचे आई-वडील त्याच्या नावाने पोस्टमध्ये खाते उघडू शकतात आणि गुंतवणूक करून व्याजदराचा लाभ मिळवू शकतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Post Office FD Scheme(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x