 
						Post Office Scheme | इंडिय पोस्ट ऑफीसतर्फे गुंतवणुकदारांना विविध गुंतवणूक योजना ऑफर केल्या जातात. या योजना दीर्घ काळात लोकांना सुरक्षिततेसह पहमखास रिटर्न ही कमावून देतात. पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करून उत्तम रिटर्न मिळवणे शक्य आहे. आज लेखात आपण अशा योजने बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. या योजनेचे नाव आहे, ‘ग्राम सुरक्षा योजना’.
पोस्ट ऑफिसच्या ‘ग्राम सुरक्षा योजना’ मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमी जोखमीसह जबरदस्त परतावा मिळतो. या योजनेत दरमहा 1500 रुपये जमा करून गुंतवणूकदार परिपक्वतेच्या वेळी 31 ते 35 लाख रुपये परतावा सहज कमवू शकतात. पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करण्याची वयोमर्यादा 19 ते 55 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ‘पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत’ पैसे जमा करू शकते. शिवाय या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम म्हणून 10,000 ते 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारे पैसे जमा करू शकतात. गुंतवणूकदाराना प्रीमियम पेमेंट करण्यासाठी 30 दिवसांचा वाढीव कालावधी उपलब्ध करून दिला जातो.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना कर्ज घेण्याची सुविधा देखील मिळते. या योजनेत गुंतवणूक केल्यास 3 वर्षांनी पॉलिसी सरेंडर करता येते. योजना सरेंडर केल्यास गुंतवणूकदारांना कोणताही परतावा मिळणार नाही.
रोज 50 रुपये गुंतवून 35 लाख रुपये मिळवा :
जर समजा तुमचे वय आता 19 वर्षे असून तुम्ही किमान 10 लाख रुपयांच्या योजनेमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केली, तर 55 व्या वर्षी 31.60 लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला प्रति महिना 1515 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल. वयाच्या 58 व्या वर्षी 33.40 लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला 1463 रुपये मासिक रक्कम जमा करावी लागेल, तर वयाच्या 60 व्या वर्षी 34.60 लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला 1411 रुपये रक्कम जमा करावी लागेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		