27 November 2022 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजून किती तक्रारी करायच्या? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या तात्यांनी पक्ष सोडावा यासाठीच वरिष्ठांकडून लाबिंग? लाव्हा फुटणार? OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ?
x

Post Office Scheme | या सरकारी मासिक उत्पन्न योजनेत शून्य रिस्कवर गुंतवणूक करा, दरमहा 4950 रुपये मिळतील, पूर्ण माहिती जाणून घ्या

Post Office MIS Scheme

Post Office Scheme| पोस्ट ऑफिसमध्ये मासिक बचत खाते उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडावे लागेल. यासाठी काही महत्वाचे कागदपत्र आवश्यक आहेत, तुमच्याकडे ओळखपत्र म्हणून तुम्ही तुमचा आधार कार्ड,पासपोर्ट, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता. मासिक बचत खाते उघडण्यासाठी तुम्हाला 2 पासपोर्ट आकाराचे फोटो सुद्धा द्यावे लागतील.

Post Office MIS :
शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात गुंतवणूक करणे, आणि त्यातून परतावा कमावणे खूप जोखमीचे आहे. गुंतवणूक करताना योजना अत्यंत काळजीपूर्वक निवडली पाहिजे. तुम्ही गुंतवणुकीसाठी योजना निवडताना आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला हमखास परतावा मिळवून देईल अशी योजना निवडली पाहिजे. आज या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना जिला पोस्ट ऑफिस MIS असेही म्हणतात, ही सविस्तर माहित देणार आहोत. ही पोस्ट ऑफिसची एक सुपरहिट अल्पबचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एकरकमी गुंतवणुक करू शकता. Post Office MIS खात्याचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्ष निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परतावा दिला जाईल. चला तर मग जाणून घेऊ या योजनेची सविस्तर माहिती

योजना खात्याचे प्रकार :
पोस्ट ऑफिस च्या या योजनेत तुम्ही दोन प्रकारचे गुंतवणूक खाते उघडू शकतात. एकल खाते, आणि संयुक्त खाते. एकल खात्यात तुम्ही किमान एक हजा आणि कमाल 4.5 लाख रुपये गुंतवणूक करू शकता. तर संयुक्त खात्यात किमान एक हजार आणि कमाल 9 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. तुम्ही एका एकल खात्यात एका वेळी कमाल 4.5 लाख रुपयेच जमा शकता. त्याच वेळी, संयुक्त खात्यात कमाल गुंतवणूक मर्यादा 9 लाख निश्चित करण्यात आली आहे.

Post Office MIS चे फायदे :
पोस्ट ऑफिस MIS योजनेत दोन किंवा तीन लोक एकत्र येऊन संयुक्त खाते उघडू शकतात, आणि गुंतवणूक सुरू करू शकता. संयुक्त खात्यातील गुंतवणुकीच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सभासदामध्ये समान वाटप केले जाते. तुम्ही संयुक्त खाते कधीही विभाजित करून त्याला वेगळ्या एकल खात्यात रूपांतरित करू शकता. किंवा एकल खाते हवे तेव्हा संयुक्त खात्यात रूपांतरित करू शकता. MIS खात्यात कोणतेही बदल करण्यासाठी सर्व खाते धारकांचा एक संयुक्त अर्ज सबमिट करावा लागेल. योजनेच्या मॅच्युरिटीवर म्हणजेच पाच वर्षे कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्ही हा कालावधी आणखी 5-5 वर्ष वाढवू शकता. MIS खात्यात नॉमिनी सुविधाही देण्यात आली आहे. या योजनेत गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात आणि त्यावर भारत सरकार द्वारे हमी दिली जाते.

योजनेचे व्याजदर :
इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, मासिक उत्पन्न योजनेवर गुंतवणूकदाराला वार्षिक 6.6 टक्के दराने व्याज परतावा दिला जातो. हा व्याज परतावा दर महिन्याला त्या व्यक्तीच्या खात्यात जमा केला जातो. या गुंतवणूक योजनेत फक्त भारतीय नागरिकच गुंतवणूक करू शकतो. आणि त्याच्या गुंतवणुकीवर भारत सरकार द्वारे हमी दिली जाते.

योजना रद्द करण्याचे विशेष नियम :
Post Office MIS योजनेचा मुदतपूर्ती कालावधी पाच वर्ष निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही ही योजना हवी तेव्हा बंद करू शकता. तुम्ही योजना सुरू केल्याच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच योजना बंद करून तुमचे पैसे काढू शकता. या योजनेच्या नियमांनुसार, ‘एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान योजना बंद करून पैसे काढल्यास, एकूण ठेव रकमेच्या 2 टक्के रक्कम वजा करून परत दिली जाईल. जर तुम्ही खाते उघडल्यानंतर 3 वर्षांच्या आत योजना बंद करून पैसे काढू इच्छित असाल तर तुमच्या ठेवीपैकी 1 टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम तुम्हाला दिली जाईल.

MIS खाते उघडण्याची प्रक्रिया :
Post Office MIS खाते उघडण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडावे लागेल. यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्र असणे आवश्यक आहे. ओळखपत्रासाठी आधार कार्ड, पासपोर्ट,मतदार कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, या पैकी एक असणे आवश्यक आहे. तुम्हाला खाते उघडताना 2 पासपोर्ट आकाराचे फोटोही द्यावे लागतील. पत्त्याच्या पुराव्यासाठी, सरकारने जारी केलेले ओळखपत्र,युटिलिटी बिल, किंवा ज्यावर पत्ता नमूद असेल ते दस्तेवज जमा करावे लागेल. हे कागदपत्र गोळा केल्यावर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मासिक उत्पन्न योजनेचा फॉर्म भरून सबमिट करावा. या योजनेचे खाते उघडण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. ऑनलाईन फॉर्म भरा आणि त्यात नॉमिनीचे नाव टाका. हे खाते उघडल्यावर योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला 1000 रुपये जमा करावे लागतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office MIS Scheme Investment benefits and return on 1 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x