27 July 2024 2:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका
x

Post Office Scheme | या पोस्ट ऑफीस मासिक बचत योजनेचे व्याजदर वाढले, दरमहा 10650 व्याज मिळेल, स्कीम डिटेल

Highlights:

  • Post Office Scheme
  • गुंतवणुकीवर व्याज परतावा गणना
  • दरमहा किती कमाई होईल?
  • एकल खात्यात गुंतवणूक
  • 1 जानेवारी 2023 पूर्वी मिळणारा परतावा
  • गुंतवणुकीवर परतावा
Post Office Scheme

Post Office Scheme | सध्या जर तुम्ही एकरकमी मोठी गुंतवणूक करण्याची संधी शोधत असाल तर तुम्ही इंडिया पोस्टच्या ‘मासिक बचत योजनेचा’ लाभ घेऊ शकता. जर तुमच्याकडे एक मोठी रक्कम शिल्लक असेल तर ती योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. बँकेत पैसे ठेवल्याने वाढत नाही, तर ते गुंतवणूक केल्याने वाढतात. इंडिया पोस्ट ऑफीसच्या ‘राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजने’ मध्ये गुंतवणूक करून तुम्ही पैसे वाढवू शकता.

अर्थसंकल्पात केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना म्हणजेच POMIS साठी कमाल ठेव मर्यादा दुप्पट केल्याची घोषणा केली आहे. एकल खात्यात गुंतवणूक करण्याची मर्यादा वाढवून 9 लाख रुपये करण्यात आली आहे, तर संयुक्त खात्यात गुंतवणूक करण्याची मर्यादा 18 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा एकल खात्यासाठी 4.50 लाख आणि संयुक्त खात्यासाठी 9 लाख रुपये होती. इंडिया पोस्ट मासिक बचत योजनेतील व्याजदरही वाढवण्यात आले आहेत.

गुंतवणुकीवर व्याज परतावा गणना :
POMIS योजनेवर 6.7 टक्क्यांऐवजी 7.1 टक्के वार्षिक व्याज परतावा दिला जाणार आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशावर जो वार्षिक वार्षिक व्याज मिळतो, त्याला 12 मासिक भागांमध्ये विभाजित करून दरमहा खात्यात जमा केले जाईल.

जर तुम्हाला व्याज परतावा खात्यात नको असेल तर तुम्ही ती रक्कम मूळ गुंतवणूक केलेल्या रकमेत जोडू शकता, आणि त्यावर तुम्हाला व्याज मिळेल. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे असेल. 5 वर्षानंतर तुम्ही गुंतवणूक कालावधी नवीन व्याजदरानुसार वाढवू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला बँक एफडीच्या तुलनेत जास्त परतावा मिळेल.

दरमहा किती कमाई होईल?
* योजना : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
* व्याज दर वार्षिक : 7.1 टक्के
* संयुक्त खाते कमाल गुंतवणूक : 18 लाख रुपये
* वार्षिक व्याज : 127800 रुपये
* मासिक व्याज : 10650 रुपये

एकल खात्यात गुंतवणूक :
* योजना : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
* व्याज दर वार्षिक : 7.1 टक्के
* एकल खाते कमाल गुंतवणूक : 9 लाख रुपये
* वार्षिक व्याज : 63900 रुपये
* मासिक व्याज : 5325 रुपये

1 जानेवारी 2023 पूर्वी मिळणारा परतावा :
* व्याज दर वार्षिक : 6.7 टक्के
* संयुक्त खात्यातील गुंतवणूक मर्यादा : 9 लाख रुपये
* वार्षिक व्याज : 60300 रुपये
* मासिक व्याज : 5025 रुपये

गुंतवणुकीवर परतावा :
डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम म्हणजेच POMIS योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक 6.7 टक्के व्याज परतावा मिळत होता. या संदर्भात संयुक्त खात्यात कमाल 9 लाख रुपये गुंतवणूक केल्यास वार्षिक 60300 रुपये व्याज परतावा मिळत होता. तर मासिक 5025 रुपये व्याज परतावा मिळत होता. एकल खात्यात 4,50,000 लाख रुपये गुंतवणूक मर्यादा होती, तर त्यावर फक्त 2,513 रुपये मासिक व्याज दिला जात होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post Office Monthly income Scheme investment benefits on 14 October 2023.

हॅशटॅग्स

#Post Office Schemes(72)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x