 
						Post Office Scheme | पोस्टाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. काही योजनांमध्ये एकरक्कमी पैसे भरल्यानंतर आणि मॅच्युरिटी पिरियड पूर्ण झाल्यानंतर व्याजदर असे चांगले पैसे मिळतात. अशीच एक स्कीम म्हणजे सीनियर सिटीजन सेविंग स्कीमा. या स्कीमचं अकाउंट तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडू शकता.
तुम्ही सिंगल आणि जॉईंट खातं उघडू शकता
या योजनेने ग्राहकांना पाच वर्षांची मॅच्युरिटी दिलेली असते. त्याचबरोबर तुम्ही सिंगल आणि जॉईंट दोन्ही प्रकारे तुमचं खातं उघडू शकता. या खात्यामध्ये कमीत कमी हजार रुपये आणि जास्तीतजास्त 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा दिली जाते.
प्रत्येक महिन्याला उत्पन्नाचे साधन
पोस्टाच्या स्कीम सरकारी असल्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे तुमचे पैसे गुंतवू शकता. या स्कीमची खासियत म्हणजे तुम्हाला यामध्ये एकरक्कमी पैसे गुंतवावे लागतील जेणेकरून प्रत्येक महिन्याला उत्पन्नाचे साधन म्हणून तुम्हाला या पैशांचा उपभोग घेता येईल. एवढेच नाही तर मॅच्युरिटी पिरेड संपल्यानंतर जमा झालेली सर्व रक्कम तुम्हाला देण्यात येईल.
8.2% व्याजदर
‘सीनियर सिटीजन सेविंग स्कीम’ ही योजना नागरिकांना 8.2% ने व्याजदर देते. हे व्याजदर तिमाही व्याजदरानुसार येते. परंतु तुम्ही वार्षिक व्याजदराच्या हिशोबाने 8.2% ने घेऊ शकता.
तिमाह 30,750 रुपये व्याज मिळेल
या योजनेमध्ये पाच वर्षांच्या मॅच्युरिटी पिरेडवर तुम्ही 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यावर तुम्हाला 8.2% व्याजदर लागू होईल. वर्षाच्या हिशोबाने फक्त व्याजदराचेच तुम्हाला वर्षाला 1,23,000 रुपये मिळतील आणि पाच वर्षाचं कॅल्क्युलेशन पाहता 6,15,000 व्याजदर मिळेल. याचा अर्थ तिमाही व्याज 30,750 रुपये एवढा असेल.
योजनेचे आणखीन एक फायद्याची गोष्ट म्हणजे आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत तुम्ही दीड लाखानपर्यंत गुंतवणूक करत असाल तर, टॅक्स सूट देखील मिळते. त्यामुळे ही स्कीम ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायद्याची ठरू शकते.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		