 
						Post Office Scheme | पोस्टाच्या सर्वच योजना विश्वसाच्या असतात. कारण पोस्टमधील सर्व योजना सरकारमान्य आहेत. यात गुंतवलेले पैसे कायम सुरक्षीत राहतात. त्यामुळे सर्वच सामान्य माणसे या योजनेत पैसे गुंतवणे पसंत करतात. अशात पोस्टाची अशी देखील एक योजना आहे ज्यात तुम्हाला दर महिन्याला पगारा प्रमाणे एक ठरावीक रक्कम मिळते. याचा उपयोग प्रत्येक सेवानिवृत्त व्यक्तीला जास्त होतो.
जेव्हा आपण सेवा निवृत्त होतो तेव्हा कामातून एक मोठी रक्कम दिली जाते. खाजगी कंपनीतील नोकरी असेल तर त्या व्यक्तीला दर महा पेंन्शनची सुविधा नसते. अशा वेळी सेवानिवृत्तीची रक्कम तुम्ही या योजनेत गुंतवू शकता. त्यामुळे दर महिन्याला एक ठरावीक रक्कम तुमच्या खात्यात जमा राहते. तसेच तुमच्या रकमेचे व्याज देखील यात जमा होईल.
मंथली इनकम स्कीम असे या योजनेचे नाव आहे. यात तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. तसे पाहीले तर पोस्टाची ही योजना पेन्शन प्रमाणे काम करणारी अल्पबचत योजना आहे. यात दर महा उत्तम परतावा मिळतो.
पोस्टाच्या या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. तुमच्या सोई नुसार तुम्ही हा कालावधी वाढवू शकता. पाच वर्षांची मॅच्यूरीटी असलेली ही योजना तुम्हाला ६.६ टक्के व्याज एका वर्षासाठी पुरवते. पाच वर्षे पुर्ण झाल्यावर तुम्हाला तुमची उर्वरीत रक्कम परत मिळते.
योजनेचा कालावधी पूर्ण होईल तेव्हा दर महिना तुम्हाला निश्चीत रक्कम दिली जाते. या योजनेत जास्तीत जास्त ४.५ लाख रुपयांची गुंतवणूक तुम्ही करू शकता. तसेच यासाठी संयूक्त खातो उघडण्याची देखील सवलत आहे. त्यामुळे तुम्हाला ९ लाखांपर्यंत गुंतवणूक मिळते. फक्त १००० रुपये भरून तुम्ही खाते उघडू शकता.
उदाहरणाद्वारे समजून घ्यायचे झाल्यास जर ४.५ लाख रुपये जमा केले तर ६.६ टक्के वार्षीक व्यज या दराने महिन्याला २४७५ रुपये मिळतील आणि पाच वर्षांत ही रक्कम २९,७०० रुपये होतो. तसेच संयूक्त खात्यात ९ लाखांची गुंतवणूक असेल तर व्याज पकडून ही रक्कम ५९,४०० रुपये होते. म्हणजे महिन्याला तुम्हाला ४९५० रुपये मिळतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		