
Post Office Scheme | भारतात राहणारी कोणतीही महिला किंवा मुलगी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ या योजनेमध्ये स्वतःचे खाते उघडून फायदा घेऊ शकते. ही योजना खास करून महिलांसाठी तयार केली आहे. आतापर्यंत बऱ्याच महिलांनी योजनेमध्ये सहभाग दर्शवून लाखोंची कमाई केली आहे. योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना सक्षमीकरणासाठी केवळ 2 वर्षांत ही योजना 2 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळवून देते.
FD पेक्षा मिळते अधिक व्याज :
कोणत्याही बँकेतील FD पेक्षा सर्वोत्तम व्याज देण्याचा प्रयत्न पोस्टाची महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना करते. FD पेक्षा जास्त व्याज मिळत असल्यामुळे बऱ्याच महिला या योजनेशी जोडल्या गेल्या आहेत. दरम्यान गुंतवणुकीच्या शेवटच्या तारखे बद्दल सांगायचे झाले तर, तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेमध्ये 31 मार्च 2025 या तारखेपर्यंत गुंतवणूक करून लाभ घेऊ शकता.
व्याजदर तसेच किती रक्कम गुंतवू शकतो पहा :
पोस्टाच्या या योजनेमध्ये तुम्हाला 1000 रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. लवकरात लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू करा जेणेकरून 2 वर्षांतच तुमच्याजवळ लाखांच्या घरात पैसे जमा होतील. या योजनेच्या व्याजदराविषयी बोलायचं झाले तर, तुम्हाला वार्षिक आधारावर 7.5% वार्षिक परतावा मिळणार आहे.
2 लाखांच्या गुंतवणुकीचे व्याज किती :
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्टाच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेमध्ये 2 लाखांची रक्कम गुंतवली तर, 7.5% व्याजदरानुसार त्यांना 32,044 रुपये व्याजदर मिळेल. तुम्हाला या योजनेतून रक्कम काढून घ्यायची असेल तर हे केवळ 1 वर्षानंतर शक्य आहे. दरम्यान गुंतवलेल्या रक्कमेपैकी खातेधारक केवळ 40% अंशिक आधारावर रक्कम काढू शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.