
Post Office Scheme | जर तुम्हाला सुरक्षित योजनेत गुंतवणूक करून हमखास परतावा मिळवायचा असेल, तर पोस्ट ऑफिस एमआयएस योजना तुम्हाला खूप फायदा देऊ शकते. पोस्ट ऑफिस एमआयएस योजना ही एक अल्प बचत योजना आहे. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून व्याज परतावाच्या स्वरूपात दर महिन्याला लाभ मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या योजनेचे अनेक फायदे
योजनेचे फायदे :
या योजनेचे खास वैशिष्ट असे की, तुझी तुमच्या 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते उघडले तर तुम्हाला त्याच्या भविष्याची चिंता करण्याची गरज लागणार नाही. तुम्ही मुलांच्या नावाने गुंतवणूक करून त्यांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी लागणारे पैसे जमा करू शकता.
खाते कुठे आणि कसे उघडायचे?
तूम्ही या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन उघडू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला फक्त या योजनेचे अर्ज भरावे लागेल. या योजने अंतर्गत तुम्हाला किमान 1000 रुपये जमा करावे लागतील आणि तुम्ही कमाल 4.5 लाख रुपये या खात्यात जमा करू शकता.
गुंतवणुकीवर परतावा :
सध्या पोस्ट ऑफीस मासिक उत्पन्न योजने अंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.6 टक्के या व्याज दराने परतावा दिला जाईल. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करू शकता. या योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. 5 वर्ष कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्ही योजनेची मुदत वाढवू शकता किंवा योजना बंद करू शकता.
परतावा चे हिशोब समजून घ्या :
* समजा तुमचे मूल 10 वर्षांचे आहे, आणि तुम्ही त्याच्या नावावर 2 लाख रुपये पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवले, तर सध्याच्या 6.6 टक्के व्याज दराने तुम्हाला 1,100 रुपये परतावा मिळेल.
* पाच वर्षांचा परिपक्वता कालावधी पूर्ण झाल्यास तुम्हाला 66000 रुपये परतावा मिळेल. योजनेच्या मुदती शेवटी तुम्हाला तुमचे 2 लाख रुपये ही परत दिले जातील.
* तुम्हाला मुलाच्या नावाने गुंतवणूक केल्यास मासिक 1100 रुपये व्याज परतावा मिळू शकतो, ज्याचा वापर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी करू शकता.
* समजा तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने कमाल रक्कम 4.5 लाख रुपये गुंतवली तर तुम्हाला मासिक 2500 रुपये व्याज परतावा म्हणून दिले जातील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.