
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही अशी अल्पबचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एकूण कितीही गुंतवणूक कराल, ती मॅच्युरिटीवर 3 पट मिळण्याची हमी आहे. म्हणजेच एकूण डिपॉझिट रकमेच्या 200% वाढ करून तुम्हाला पैसे मिळतील.
म्हणजेच यात मिळणारे व्याज एकूण गुंतवणुकीपेक्षा दुप्पट असेल. विशेष म्हणजे यात तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल, तर पुढील 6 वर्षांसाठी म्हणजेच मॅच्युरिटीपर्यंत टोटल क्लोजिंग बॅलन्सवर व्याज जोडले जात राहील. या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त 70 लाख रुपये उभारता येतील.
आता 8.2 टक्के वार्षिक व्याज
सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या वार्षिक 8.2 टक्के व्याज दर आहे. या योजनेत तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1,50,000 रुपये वार्षिक जमा करू शकता. तर किमान 250 रुपये जमा करता येतील. या योजनेअंतर्गत पालकांना मुलीच्या नावावर केवळ 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. खात्याचा मॅच्युरिटी पीरियड 21 वर्षांचा असतो. 15 वर्षांनंतर उर्वरित 6 वर्षांच्या कालावधीत 15 वर्षांच्या क्लोजिंग बॅलन्सवर वार्षिक 8.2 टक्के दराने व्याज मिळेल. 21 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर पूर्ण रक्कम मिळणार आहे.
15 वर्षात तुम्ही जेवढी रक्कम जमा कराल, त्याच्या 3 पट रक्कम मिळेल
* SSY खाते सुरू वर्ष : 2024
* SSY मधील व्याजदर : वार्षिक 8.2 टक्के
* वार्षिक गुंतवणूक : 1,50,000 रुपये
* 15 वर्षात गुंतवणूक : 22,50,000 रुपये
* 21 वर्षांच्या मुदतीची एकूण रक्कम : 69,27,578 रुपये
* व्याज लाभ : 46,77,578 रुपये
* अकाऊंट मॅच्युरिटी चे वर्ष : 2045
मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढू शकता का?
जर मुलगी 18 वर्षांची असेल तर तिच्या लग्नाच्या मुदतपूर्तीपूर्वी 50% रक्कम काढता येते. याशिवाय खाते सुरू झाल्यानंतर 5 वर्षांनंतर काही विशिष्ट परिस्थितीत मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढता येतात. जसे की खातेदाराचा आकस्मिक मृत्यू, पालकाचा मृत्यू, खातेदाराचा गंभीर आजार किंवा खाते सुरू ठेवण्यास असमर्थता.
पूर्णपणे टॅक्स फ्री योजना
सुकन्या समृद्धी योजनाही पीपीएफप्रमाणेच पूर्णपणे करमुक्त योजना आहे. साकान्याला EEE म्हणजेच तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर करसवलत मिळते. प्रथम, प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाखांपर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीवर सूट. दुसरं म्हणजे त्यातून मिळणारा परतावा करपात्र नसतो. तिसरे म्हणजे मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम करमुक्त असते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.