
Post Office Scheme | केंद्र सरकार आपल्या भारतातील महिलांसाठी विविध योजना राबवत आहे. सध्या पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना सगळीकडे चर्चिली जात आहे. अगदी बँकांमध्ये देखील सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येत आहे. दरम्यान तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये देखील तुमच्या 10 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीचे खाते उघडू शकता.
मुलींच्या उच्च शिक्षणाकरिता आणि त्यांना सक्षम बनवण्याकरिता सरकार सुकन्या समृद्धी सारख्या योजना राबवत आहे. ही योजना मुलीच्या 21व्या वर्षी मॅच्युअर होते. म्हणजेच एकूण पंधरा वर्षांसाठी तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. सध्या ही योजना वार्षिक आधारावर 8.2% टक्क्यांचे व्याजदर प्रदान करत आहे. आज आपण पोस्टाच्या या योजनेमध्ये प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवल्यानंतर मॅच्युरिटीवर किती लाख रुपयांचा परतावा मिळणार याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
सुकन्या समृद्धी योजनेचे वैशिष्ट्ये :
1. पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही एकाच घरातील दोन मुलींचे खाते उघडू शकता. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कुटुंबामध्ये 2 जुळ्या मुली असतील त्या कुटुंबातील इतर आणखीन एक मुलगी पोस्टाच्या योजनेमध्ये खातं उघडू शकते.
2. योजनेच्या गुंतवणुकीच्या लिमिटविषयी बोलायचं झाले तर, तुम्ही वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख तर, कमीत कमी 250 रुपयांची गुंतवणूक करू शकतात.
3. पोस्टाची सुकन्या समृद्धी ही योजना गुंतवणुकीनंतर 21 वर्षांनी मॅच्युअर होते. म्हणजेच तुमच्या मुलीच्या 18व्या वर्षी योजना बंद होणार आणि तुमच्या मुलीला गुंतवणुकीची संपूर्ण रक्कम मिळणार.
4. तुम्ही पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये ज्या दिवशी खात उघडता त्या तारखेपासून ते 5 वर्ष होईपर्यंत तुम्ही खाता बंद करू शकत नाही. 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खाते बंद करायचे असेल तर अगदी आरामात करू शकता.
5. तुम्ही पोस्टाच्या योजनेमध्ये प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपयांची रक्कम जमा करत असाल तर, योजनेच्या मॅच्युरिटी काळापर्यंत म्हणजेच 21 वर्षानंतर तुमच्या खात्यामध्ये 46,18,385 रुपये मिळतील. या रक्कम येतील तुम्ही गुंतवलेली रक्कम 15,00,000 लाख रुपये असेल आणि व्याजाने कमावलेली रक्कम 31,18,385 असेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.