27 September 2022 4:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | या स्वस्त शेअरच्या संयमी गुंतवणूकदारांची लॉटरीच लागली, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3.85 कोटी परतावा, नाव सेव्ह करा Viral Video | गायीने ATM मशीन सेंटरचा बनवला गोठा, पैसे काढताना ग्राहकांवर तोंडाला रुमाल लावायची वेळ, पहा व्हिडिओ Multibagger Stocks | हा स्टॉक मंदीतही पैसा वेगाने वाढवतो, तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला Infinix Zero Utra 5G Smartphone | 200MP कॅमेरासह इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा 5G स्मार्टफोन लाँच होणार, फीचर्स आणि किंमत पहा WAPCOS IPO | वापकोस कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या Private Employee Salary Hike | खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते?, रिपोर्ट प्रसिद्ध झाला Zomato Share Price | झोमॅटो शेअरच्या गुंतवणूकदारांची धाकधूक थांबेना, थेट 60 रुपयांवर आला, पुढे काय होणार जाणून घ्या
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत हमखास पैसे होणार दुप्पट, सुरक्षित योजना आणि हमखास परतावा

post office scheme

Post Office Scheme | सतत घसरणाऱ्या व्याजदरांमध्ये तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र या योजनेत गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुमचे पैसे तर सुरक्षित राहतीलच सोबत, मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला दुप्पट परतावाही मिळेल. या योजनेचा कालावधी 124 महिने एवढं आहे. या योजनेचा परतावा म्हणून चक्रवाढ पद्धतीने व्याजदर 6.9 टक्के एवढा निश्चित करण्यात आला आहे.

किसान विकास पत्र ही सुरक्षित आणि आकर्षक अशी योजना आहे, जी भारत सरकारद्वारे संचालित केली जाते. ही योजना प्रामुख्याने शेतकरी आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. जेणेकरून ते त्यांचे पैसे दीर्घकाळ बचत होऊ शकतील. यामध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक करायची गरज नाही.

तुम्हाला जर या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता, तुम्ही देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांद्वारे या योजनेत गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही मात्र किमान मर्यादा 1,000 रुपये आहे. कमीत कमी एक हजार पासूनच तुमची गुंतवणूक करू शकता. तुम्ही योजनेत 50,000 रुपये एकरकमी गुंतवल्यास, तुम्हाला तुम्हाला मुदत पूर्तीच्या वेळी त्याचा परतावा म्हणून 1 लाख रुपये मिळतील.

2.5 वर्षानंतर मिळणारा परतावा :
किसान विकास पत्र योजनेत प्रमाणपत्राच्या स्वरूपात पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये 1,000, 2,000, 5,000, 10,000 आणि 50,000 रुपयांपर्यंतचे प्रमाणपत्र दिले जाते. ज्याचा व्याजदर ते प्रमाणपत्र जारी करताना निश्चित केला जातो. मात्र, सरकारी नियमांनुसार त्यात बदल होऊ शकतो. या योजनेमध्ये मुदतपूर्ती कालावधी 124 महिने असला तरी जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही 2.5 वर्षांच्या आत पैसे काढू शकता.

आवश्यक कागदपत्रे :
योजनेच्या नियमांनुसार, एखाद्या प्रौढ व्यक्तीला अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने आणि मानसिकरित्या कमजोर किंवा अपंग व्यक्तीच्या वतीने पालक म्हणून या योजनेत गुंतवणूक करू शकतात. योजनेचे खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट यासारखी ओळखपत्रे, फोटो आवश्यक आहेत.

लॉकिन कालावधीनंतर पैसे काढल्यास काय होईल :
* परतावा (वर्षांमध्ये) / परतावा (रु. मध्ये)
* 2.5 वर्षांनी / 3 वर्षापूर्वी – 1,154
* 5 वर्षांनंतर / 5.5 वर्षापूर्वी – 1,332
* 7.5 वर्षांनंतर / 8 वर्षापूर्वी – 1,537
* 10 वर्षांनतर / मुदतपूर्व – 1,774
* मॅच्युरिटीनंतर / – 2,000

गरज नसेल तर मॅच्युरिटीच्यानंतरच पैसे काढा :
गुंतवणूक सल्लागार आणि आर्थिक तज्ञ नेहमी सल्ला देतात की ही भारत सरकारची योजना आहे. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करताना कोणताही धोका नसतो आणि सरकार ह्यावर हमी सुद्धा देते. तसेच मॅच्युरिटीवर तुमचे गुंतवलेले पैसे दुप्पट होतात. जर तुम्हाला 124 महिन्यांपूर्वी पैशांची गरज लागली तुम्ही अडीच वर्षानंतरही तुमचे पैसे काढून घेऊ शकता. अशा परिस्थितीत तुम्हाला कमी व्याज मिळेल आणि कमी परतावा मिळेल. त्यामुळे जर गरज नसेल तर केवळ मॅच्युरिटीनंतरच पैसे काढा, जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्त परतावा आणि फायदा मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post office Schemes Kisan Vikas Patra return on investment on 30 July 2022.

हॅशटॅग्स

#Post Office Schemes(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x