 
						Post Office Special Scheme | जर तुम्हाला पैशातून पैसा कमवायचा असेल तर ते प्रथम योग्य ठिकाणी गुंतवणे आवश्यक आहे. प्रत्येकजण अशा योजनेच्या शोधात असतो जिथे त्यांचे पैसे वाया जाणार नाहीत आणि त्यांना फ्लॅट परतावादेखील मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महान योजनेबद्दल सांगत आहोत. खरं तर पोस्ट ऑफिसबचत योजना खूप चांगल्या आहेत. हल्ली बँक आरडी बाबतही गुंतवणूदारांमध्ये खूप उत्सुकता आहे. पण पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा बॅंकेहून चांगला आहे.
पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना :
पोस्ट ऑफिसमध्ये आरडी अकाऊंट उघडण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा 5 वर्षांसाठी पैसे गुंतवावे लागतील. जर तुम्हाला 10 वर्षांसाठी मुदतवाढ द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्याजाची गणना प्रत्येक तिमाहीच्या (Annual Rate) आधारे केली जाते. म्हणजेच तुमच्या खात्यात जमा झालेल्या रकमेवर जे काही व्याज मिळेल ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी जोडले जाईल. यामध्ये चक्रवाढ व्याजाचे सूत्र काम करते.
पोस्ट ऑफिसमध्ये आरडी करत असाल तर त्याचा विचार केंद्र सरकारच्या अल्पबचत योजनेत केला जातो. यावर मिळणारे व्याज दर तिमाहीला अर्थ मंत्रालयाकडून निश्चित केले जाते. चालू तिमाहीसाठी त्यावर वार्षिक ५.८ टक्के (तिमाही चक्रवाढ) व्याज मिळत आहे.
10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 16 लाख रुपये
जर तुम्ही या योजनेत 10 वर्षांसाठी दरमहा 10,000 रुपयांची गुंतवणूक केली तर 10 वर्षांनंतर मॅच्युरिटी चा विचार केला जाईल. जर तुम्हाला 10 वर्षांसाठी 5.8 टक्के दराने परतावा मिळाला तर मॅच्युरिटीवर तुम्हाला चक्रवाढ व्याजासह 16,28,963 रुपये मिळतील.
अॅडव्हान्स डिपॉझिटची सुविधाही
या योजनेत अॅडव्हान्स डिपॉझिटची सुविधाही आहे. यामध्ये गुंतवणूकदार 12 महिने किंवा पूर्ण 5 वर्षे अगोदर पैसे जमा करू शकतात. यामुळे तुम्हाला गुंतवणुकीवर काही प्रमाणात सूट मिळेल.
आरडी खाते 3 वर्षांनी बंद करू शकता
खाते उघडल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही खाते बंद करू शकता. प्री-मॅच्युअर क्लोजिंगच्या बाबतीत व्याजाची गणना आरडी योजनेच्या व्याजावर नाही, तर पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याजावर असेल. आगाऊ रक्कम सादर केली असेल, तर प्री-मॅच्युअर क्लोजर शक्य होणार नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		