PPF Account | पगारदारांनो! ‘या’ अकाउंटमध्ये 1 लाखांची रक्कम गुंतवा, तुमच्या खात्यामध्ये 27,12,139 येतील

PPF Account | सध्याच्या घडीला भारतीय शेअर बाजार पूर्णतः कोलमडलेला आहे. एकीकडे शेअर बाजाराची घसरण तर, दुसरीकडे म्युच्युअल फंडांत पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार देखील चिंताग्रस्त झाले आहेत. बऱ्याच गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ उतरत्या शेअर बाजारामुळे खराब होत चालला आहे. शेअर बाजाराचं हे असंच असतं कधी नफा तर कधी तोटा तर, कधी मिळतो छप्पर फाड परतावा.

अशा परिस्थिती बहुतांश नवखे तरुण देखील शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास उत्सुकता दर्शवतात परंतु शेअर मार्केटविषयी फारशी माहिती नसल्याने आणि बाजार घसरणीकडे असल्याने ते निराश होतात. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी जोखीम पत्करण्याची तयारी ठेवावीच लागते. जर तुम्हाला जोखीम उचलायची नसेल आणि निश्चित परतावा हवा असेल तर तुम्ही शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी पीपीएफ म्हणजेच ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ खात्यामध्ये गुंतवणूक करू शकता.

किमान एका वर्षात होईल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक :
केंद्र सरकारकडून चालवली जाणारी पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. भारत देशामध्ये अगदी कोणत्याही बँकेत तुम्ही तुमच्या नावाने पब्लिक प्रॉव्हिडंट फंड नावाचे खाते उघडू शकता. हे खाते तुम्हाला निश्चित परतावा देण्यास मदत करते. या योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही एका वर्षामध्ये 500 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

तुम्हीदेखील 500 रुपयांच्या बचतीपासून सुरू करता येणाऱ्या योजनेच्या शोधात असाल तर, आजची बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक करून मोठा लाभ मिळवू शकता. ही योजना वार्षिक आधारावर 7.1% दराने व्याज देते. योजनेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यामध्ये प्रत्येक महिन्याला देखील पैसे गुंतवू शकता आणि वर्षाला एकदम एक रक्कमी रक्कम देखील गुंतवू शकता.

पीपीएफ खात्यात प्रत्येक वर्षाला 1,00,000 ची रक्कम गुंतवली तर, 15 वर्षांमध्ये खात्यात किती रक्कम जमा होईल :
1. पीपीएफ खाते 15 वर्षानंतर परिपक्व होते. त्यामुळे 15 वर्षानंतर प्रत्येक वर्षाच्या हिशोबाने 1,00,000 ची रक्कम गुंतवली असता तुमच्या खात्यात किती पैसे जमा होतील याचे कॅल्क्युलेशन आता पाहणार आहोत.

2. समजा तुम्ही प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपयांची रक्कम सातत्याने गुंतवत असाल तर, मॅच्युरिटी काळ संपल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 27,12,139 येतील. या पैशांमध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक सोडून केवळ व्याजाने कमावलेली रक्कम 12,12,139 एवढी आहे.

3. पीपीएफ खाते तुम्ही स्वतःसाठी किंवा वयात न आलेल्या मुला मुलींसाठी देखील उघडू शकता. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे तुम्ही एका व्यक्तीच्या नावावर केवळ एकच खाते उघडू शकता.