3 May 2025 5:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
x

Senior Citizen Saving Scheme | पोस्टाच्या या जबरदस्त योजनेत पैसे गुंतवा, 5 वर्षांत कमवाल व्याजाचे 12 लाख रुपये - Marathi News

Highlights:

  • Senior Citizen Saving Scheme
  • किती टक्के व्याजदर मिळतो :
  • जाणून घ्या या सर्व सुविधा :
  • सिंगलसह जॉईंट अकाऊंट देखील उघडू शकता :
  • असे मिळतील व्याजाचे 12 लाख :
  • दोन वेगवेगळ्या खात्याच्या गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन :
Senior Citizen Saving Scheme

Senior Citizen Saving Scheme | प्रत्येक नागरिकाला सेवानिवृत्तीनंतर रिटायरमेंटची मोठी रक्कम मिळते. बऱ्याच व्यक्ती ही रक्कम थेट बँकेमध्ये जमा करतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपले हे पैसे बँकेमध्ये सुरक्षित आणि व्यवस्थित राहतील. पैशांना कोणाची नजर लागणार नाही घरात ठेवण्यापेक्षा आपण बँकेत पैसे ठेवले तर उत्तम राहील असा विचार अनेकजण करतात. कारण की त्यांना गुंतवणुकीचे इतर पर्याय माहीतच नसतात. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या एका जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेचे नाव सिनिअर सिटीजन सेविंग स्कीम असं असून ती योजना ज्येष्ठ व्यक्तींसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे.

किती टक्के व्याजदर मिळतो :
पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये भारताचा कोणताही ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करू शकतो. या योजनेमध्ये वार्षिक व्याजदर 8.2% ने दिला जातो. व्याजदराची संख्या जास्त असल्यामुळे नागरिकांना जास्तीत जास्त फायदा अनुभवता येतो. दरम्यान या योजनेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असून, तुम्ही केवळ पाच वर्षांत तब्बल 12 लाख रुपये व्याजाने कमवू शकता. एवढंच नाही तर या योजनेमध्ये तुम्हाला सुरक्षिततेची हमी देण्यात येते, त्याचबरोबर चांगला रिटर्न देखील मिळवून देता येतो आणि टॅक्स बेनिफिट्स देखील प्रदान केले जातात.

जाणून घ्या या सर्व सुविधा :
पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये भारताचा कोणताही नागरिक कमीत कमी हजार रुपये भरून गुंतवणूक सुरू करू शकतो. गुंतवणुकीची लिमिट 30 लाख रुपयांपर्यंत आहे. एवढेच नाही तर, ज्येष्ठांना प्री-मॅच्युअर क्लोजरची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट देखील देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेमध्ये तुम्ही नॉमिनी देखील ठेवू शकता. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या अडचणी तुम्हाला मोठ्या वाटू शकणार नाहीत. आणखीन एक गोष्ट म्हणजे या योजनेचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर तुम्ही 3 वर्षांसाठी योजना वाढवू देखील शकता.

सिंगलसह जॉईंट अकाऊंट देखील उघडू शकता :
पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग योजनेमध्ये तुम्ही सिंगल आणि जॉईंट दोन्हीही प्रकारची खाती उघडू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर जॉईंट खातं उघडून एकत्र लाभ घेऊ शकता. एवढंच नाही तर तुम्ही दोन वेगवेगळे खाते देखील उघडू शकता. यामध्ये जॉइंट अकाउंट ओपन केलं तर, तुम्हाला 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर, 60 लाख रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल.

असे मिळतील व्याजाचे 12 लाख :
समजा एखाद्या व्यक्तीने सिंगल खात्यामध्ये 30 लाखांची गुंतवणूक केली आहे. 5 वर्षांच्या मॅच्युरिटी पिरेडवर आणि दिलेल्या व्याजदरानुसार प्रत्येक वर्षाला केवळ व्याजाचे 2,40,600 एवढी रक्कम त्या व्यक्तीला व्याजाची मिळते. तिमाही व्याज काढलं तर, 60,150 रुपये होतात आणि महिन्याच्या व्याजाची रक्कम काढली तर, 20,050 एवढी रक्कम मिळते. म्हणजेच एकूण पाच वर्षांमध्ये व्याजाची रक्कम 12,03,000 लाख रुपये जमा होतात. याचाच अर्थ 30 लाखांची गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला एकूण परतावा 42,03,000 लाख रुपये मिळतील.

दोन वेगवेगळ्या खात्याच्या गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन :
दोन वेगवेगळ्या खात्यामध्ये पैसे गुंतवले तर, 60 लाखांची रक्कम जमा होते. यामध्ये 8.2 टक्क्यांच्या हिशोबाने पाच वर्षांमध्ये वर्षाला 2,81,200 वार्षिक व्याजदर मिळते. तीन महिन्यांच्या आधारावर व्याज काढलं तर, 1,20,300 रुपये जमा होतात. आणि महिन्याला 40,100 रुपये व्याजाचे मिळतात. म्हणजेच 5 वर्षांमधील एकूण व्याजदर 24,06,000 एवढे होते. 60 लाखांच्या गुंतवणुकीचा एकूण परतावा 84,06,000 रुपये मिळतो. तुम्ही मॅच्युरिटीनंतर पुन्हा एकदा 3 वर्षांकरिता गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.

Latest Marathi News | Senior Citizen Saving Scheme 05 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Senior Citizen Saving Scheme(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या