
Tax Saving Options | जर तुम्हाला तुमचे संचित भांडवल 5 वर्षांसाठी गुंतवायचे असेल तर टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. पण जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनादेखील निवडू शकता. एकीकडे बहुतांश बँका टॅक्स सेव्हिंग एफडीवर जास्तीत जास्त 7.60 टक्के व्याज देत आहेत. तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत तुम्हाला 7.70% व्याज मिळत आहे.
येथे मिळणार 7.70 टक्के व्याज
केंद्र सरकारने 2023 च्या एप्रिल ते जून तिमाहीत पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेच्या व्याजदरात 70 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत तुम्हाला 7 टक्के व्याज मिळत होते. पण या दरवाढीनंतर आता तुम्हाला या बचत योजनेअंतर्गत 7.70 टक्के व्याज मिळणार आहे. व्याजदरात झालेली ही वाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू झाली आहे.
टॅक्स सेव्हिंग FD वर बँकांचा व्याजदर
दुसरीकडे टॅक्स सेव्हिंग एफडीअंतर्गत अॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 7 टक्के, बँक ऑफ बडोदा 6.50 टक्के, कॅनरा बँक 6.7 टक्के, एचडीएफसी बँक 7 टक्के आणि आयसीआयसीआय बँक 7 टक्के व्याज देत आहे. आयडीबीआय बँक 6.25 टक्के, डीसीबी बँक सर्वाधिक 7.60 टक्के, इंडसइंड बँक 7.25 टक्के तर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या ग्राहकांना 6.50 टक्के व्याज देत आहे.
हे आहेत पोस्ट ऑफिसच्या खास योजनेचे फायदे
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक कमीत कमी 1,000 रुपयांपासून सुरू करू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला 5 वर्षांसाठी गुंतवणूक ही करावी लागणार आहे. याशिवाय या योजनेअंतर्गत तुम्हाला इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत ची टॅक्स सूट देखील मिळते. लक्षात घ्या की केवळ निवासी भारतीय नागरिकच या योजनेअंतर्गत त्यांच्या ठेवी गुंतवू शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.