Patel Engineering Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मोठी बातमी आली, पटेल इंजिनीअरिंग शेअर्समध्ये खरेदी वाढली, हा शेअर संयमातून श्रीमंत करेल
Patel Engineering Share Price | मागील काही दिवसांपासून पटेल इंजिनीअरिंग या बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे अप्रतिम कामगिरी करत आहेत. आता या कंपनीला मध्य प्रदेश राज्य सरकारने एक मोठी ऑर्डर दिली आहे.
या कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, पटेल इंजिनीअरिंग कंपनीने एका संयुक्त उपक्रमात शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी मध्य प्रदेश राज्य सरकारच्या जल निगमकडून 1,275.30 कोटी रुपये मूल्याच्या MOU वर स्वाक्षरी केली आहे. या करारात कंपनीची हिस्सेदारी 446.36 कोटी रुपये असणार आहे. आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 0.72 टक्के वाढीसह 55.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रकल्प तपशील
पटेल इंजिनीअरिंग कंपनीला नवीन मिळालेला प्रकल्प पुढील 24 महिन्यांत पूर्ण करायचे आहे. याशिवाय कंपनीला संपूर्ण प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल करण्याचा 10 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट देखील मिळाला आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन आणि इंदूर या शहरात उभारला जाणार आहे. या प्रकल्पात पटेल इंजिनिअरिंग कंपनीचा वाटा 35 टक्के असेल. ज्याचे एकूण मूल्य 446.36 कोटी रुपये आहे.
शेअर्सची कामगिरी
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 58.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 58.80 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 13.15 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,463.77 कोटी रुपये आहे. पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीची स्थपना 1949 साली झाली होती. या कंपनीला व्यवसाय करण्याचा 74 वर्षाचा अनुभव आहे.
पटेल इंजिनीअरिंग ही कंपनी मुख्यतः जलविद्युत आणि धरण प्रकल्पांसाठी बोगदा तयार करणे, भूमिगत कामे करण्यात आघाडीवर आहे. या कंपनीने भारतभर 85 पेक्षा जास्त धरणे बांधली आहेत. आणि यासह कंपनीने 40 जलविद्युत प्रकल्प आणि 300 किमी पेक्षा जास्त लांबीचे बोगदे देखील बांधले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Patel Engineering Share Price today on 23 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News