2 May 2025 3:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

कोरोनामुळं राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, Corona Crisis, Municipal Corporations, Financially week

पुणे, ३० जुलै : कोरोनामुळे देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. राज्यावर देखील याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करीत आहे. तसेच राज्य सरकारमार्फत जेवढी शक्य आहे तेवढी मदत आम्ही देत आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींना दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवनात गुरुवारी बैठक झाली. या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, मुंबई महानगर पालिकेले कोरोना चाचण्यांचा वेग वाढवला असून ५ लाखांचा टप्पा पार करण्यात आलाय. वरळी, धरावी इतके कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यात पालिकेला यश आलंय. पण मदतीचा ओघ येण्याच्या बाबतीत पालिका मागे पडलेली दिसतेय. पालिकेने कोरोनासाठी आतापर्यंत ७०० कोटींवर खर्च केलाय. तर गेल्या चार महिन्यात पालिकेला केवळ ८६ कोटींची मदत मिळालीय. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भात माहिती मागवली होती.

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असताना इतक्या कमी मदतीमध्ये कसे काम करणार ? असा प्रश्न उपस्थित होतोय. गेल्या ४ महिन्यांत मुंबई पालिकेला कोरोनासाठी एकूण ८६ कोटी ५ लाख ३० हजार ३०३ रुपये मिळाले. या निधीमध्ये मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी ७२.४५ कोटी रुपये दिले आहेत. मिळालेल्या एकूण निधीपैकी ८४ टक्के इतकी ही रक्कम आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांनी११.४५ कोटी तर वस्त्रोद्योग मंत्रालयाने केवळ ५० लाख रुपये दिले.

खासगी लोकांनी ३५.३२ लाख रूपयांचे सहाय्य केले. आमदारांकडून केवळ १.२९ कोटी इतकी भर यामध्ये पडली. ते देखील ७ आमदारांनीच यासाठी पुढाकार घेतला. केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोणती मदत यासाठी मिळाली नाही.

 

News English Summary: The financial condition of all the Municipal Corporations in the state including Pune has become critical. Against this backdrop, the state government is seeking funds from the Center. We are also providing as much assistance as possible through the state government.

News English Title: The Financial Situation Of All The Municipal Corporations In The State Is Critical Due To corona Says CM Uddhav Thackeray News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या