10 May 2025 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Green Share Price | 30 टक्के कमाईची संधी, या मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ADANIGREEN Adani Energy Solutions Share Price | 58% परतावा मिळेल, सुवर्ण संधी, अदानी ग्रुपचा शेअर खरेदी करा - NSE: ADANIENSOL Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअर्ससाठी BUY रेटिंग, संधी सोडू नका, मिळेल मोठा परतावा - NSE: ADANIPORTS Adani Enterprises Share Price | 40% अपसाईड तेजीचे संकेत, अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार - NSE: ADANIENT Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

राज्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर | वेळीच प्राथमिक सुविधा न मिळाल्याने पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू

TV9 Marathi, Pune reporter Pandurang Raykar, Dies of Covid

पुणे, २ सप्टेंबर : कोरोना काळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.

पुण्यात पत्रकारिता करता करता पांडुरंग यांना कोरोनाने गाठलं. लढवय्या पांडुरंग यांनी कोरोनाशी दोन हात करण्याचा निर्धार केला. मात्र ऑक्सिजन पातळी कमी होत गेल्याने, पांडुरंग यांचा लढा अपुरा पडत गेला. पांडुरंग हे पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. पण त्यांची ऑक्सिजन पातळी घटल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

दुर्दैव म्हणजे पुण्यात व्हेंटिलेटर उपलब्ध होत नव्हते. मध्यरात्री पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पांडुरंग यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली केल्या. मात्र धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.

लढवय्या पांडुरंग यांच्यावर ही वेळ येत असेल, तर ही आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या चिंधड्या कशा पसरल्या आहेत, याकडे बोट दाखवणारी बाब आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री हे आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा कितीही दावा करत असले, तरी पुण्यात व्हेंटिलेटर न मिळणं आणि त्यापेक्षा अ‍ॅम्ब्युलन्सही उपलब्ध न होणं हे सरकारी दाव्याचा फोलपणा उघडा पाडतं.

ई टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही 9 मराठी असा पांडुरंग यांचा पत्रकारितेतील 15 वर्षांचा प्रवास. शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं. गेल्या तीन वर्षापासून ते टीव्ही 9 मराठीसोबत होते.

 

News English Summary: Pandurang Raikar, the Pune correspondent of ‘TV9 Marathi’ who used to report moderately during the Corona period, passed away due to the Corona. He was 42 years old. He breathed his last this morning. Shockingly, no ambulance was received from Jumbo Covid Center to take Dinanath Mangeshkar to the hospital.

News English Title: TV9 Marathi Pune reporter Pandurang Raykar dies of Covid due to lack of ambulance News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या