27 July 2024 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

India Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज

India Post GDS Recruitment 2023

India Post GDS Recruitment 2023 | सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टपाल विभागातील ४० हजार ८८९ रिक्त पदांवर नियुक्तीसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार भारतीय टपाल indiapostgdsonline.gov.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन संबंधित भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

टपाल विभागाच्या विविध पदांची निवड कशी करावी
या भरतीअंतर्गत ग्रामीण डाक सेवक (जीडीएस), शाखा पोस्टमास्टर (बीपीएम), सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (एबीपीएम) आणि डाक सेवक या पदांवर यशस्वी आणि पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीनुसार केली जाईल. टपाल विभागाकडून गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी पोस्ट विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा
* इंडिया पोस्ट – indiapostgdsonline.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
* नोंदणी करा आणि फॉर्म भरा.
* फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि पेमेंट करा.
* फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआऊट घ्या.

कोण अर्ज करू शकतात :
उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षादरम्यान असावे. एवढेच नव्हे तर उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीत गणित आणि इंग्रजी विषयांचा अभ्यास केलेला असावा. उमेदवारांना १०० रुपयांचा अर्ज भरावा लागणार आहे. मात्र, महिला/ ट्रान्स-वुमन आणि एससी/एसटी उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत उमेदवारांना आपल्या अर्जात बदल करता येणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: India Post GDS Recruitment 2023 for 40889 posts check details on 28 January 2023.

हॅशटॅग्स

#India Post GDS Recruitment 2023(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x