Metro Job | सरकारी नोकरी शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत खुशखबर समोर आली आहे. तरुणांसाठी नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सरकारी क्षेत्रात ते सुद्धा खास मेट्रोमध्ये नोकरी करण्याची संधी क्वचितच व्यक्तींना मिळते. नोएडा कार्पोरेशनने अधिकृत वेबसाईटवर नोकरी बाबतची संपूर्ण माहिती विस्तारित केली आहे.

कोणत्या पदासाठी भरती जाहीर केली आहे :

नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एनएमआरसीने जनरल मॅनेजर या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अशातच लवकरात लवकर तरुण मंडळींनी अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली पाहिजे. अर्ज प्रक्रिया केव्हाच सुरू झाली असून शेवटची तारीख 19 डिसेंबर देण्यात आली आहे.

भरतीसाठी पात्रता काय असेल :

मेट्रो रेल्वेमध्ये भरती होण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर पदवी उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या पदवी देखील उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

अर्जदाराच्या वयाची पात्रता :

नोएडा मेट्रो रेल्वे भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत असणे मर्यादित आहे. निवड झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होऊन त्यांची ऑफलाइन पद्धतीने मुलाखत घेण्यात येणार आहे. उमेदवारांच्या वेतनश्रेणीबद्दल, महिना 1,20,000 ते 2,80,000 एवढी वेतनश्रेणी असणार आहे.

अर्ज कुठे पाठवायचा :

अनेकांना प्रश्न पडला असेल की उमेदवाराचा अर्ज कुठे पाठवायचा तर, फायनान्स अँड एचआर, जनरल मॅनेजर प्रोजेक्ट, नोएडा मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, गंगा शॉपिंग कॉम्प्लेक्स सेक्टर 29 येथे उमेदवाराने कागदपत्रे पाठवून द्यायची आहेत.

Latest Marathi News | Metro Job 29 November 2024 Marathi News.

Metro Job | आता मेट्रोमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण; अर्ज प्रक्रिया, पगार आणि पात्रता काय असेल जाणून घ्या