MPSC Recruitment Updates | महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC नं परीक्षापद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पद्धतीनुसार मुख्य परीक्षा ही वर्णात्मक म्हणजेच लेखी स्वरूपाची असेल. 2023 साली होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून हे बदल लागू होतील. लोकसेवा आयोगानं पत्रक काढून याची माहिती जाहीर केली आहे.
अंंमलबजावणी 21 ऑगस्ट 2022 पासून :
राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक 2 (CSAT) अर्हताकारी करण्याचा निर्णय आयोगानं मागील महिन्यांत घेतला होता. या निर्णयाची अंंमलबजावणी 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून करण्यात येणार आहे.
मुख्य परीक्षेत काय बदल :
१. नव्या नियमानुसार राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक असेल आणि एकूण 9 पेपर असतील.
२. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे मार्कांचे विषय प्रत्येकी 25 टक्के गुणांसह अर्हताकारी असतील.
३. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 मार्कांसाठी असतील.
मुलाखतीसाठी 275 गुण :
१. मुलाखतीसाठी 275 गुण असतील.
२. या पद्धतीनं एकूण गुण 2 हजार 25 मार्कांची ही परीक्षा असेल.
३. त्याचबरोबर एकूण 24 वैकल्पिक विषयातून उमेदवारांना एक विषय निवडता येईल.
४. या विषयांची यादी देखील आयोगानं जाहीर केली.
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/fTh3slTGBm
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 24, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: MPSC Recruitment Updates on syllabus check details 25 June 2022.
