2 May 2025 1:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

Unique Health Card | आपले संपूर्ण मेडिकल रेकॉर्ड | देशात कोणत्याही रुग्णालयात मागील सर्व रिपोर्ट्स मिळणार

How to apply for Unique Health Card

नवी दिल्ली, ११ सप्टेंबर | केंद्र सरकारने युनिक हेल्थ आयडी कार्ड बनवण्याची तयारी पूर्ण केली आहे. या कार्डमध्ये आरोग्याशी संंबंधित सर्व माहितीची नोंद असेल. तुम्हाला दुसऱ्या राज्यात किंवा शहरात जायचे असले तरी आपले मेडिकल रिपोर्ट्स सोबत नेण्याची गरज राहणार नाही. कारण तुमची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री हेल्थ कार्डमध्ये नोंदलेली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन (एनडीएचएम) लाँच करू शकतात. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनमध्ये डॉक्टर, रुग्णालये, लॅब आणि केमिस्टचीही माहिती नोंदलेली असेल. त्याचा पथदर्शी प्रकल्प गेल्या वर्षीच अंदमान-निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमण-दीव, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये सुरू झाला होता. या राज्यांत युनिक कार्ड बनवण्यास सुरुवात झाली आहे. आता ही योजना देशभरात सुरू केली जाईल.

Unique Health Card, आपले संपूर्ण मेडिकल रेकॉर्ड, देशात कोणत्याही रुग्णालयात मागील सर्व रिपोर्ट्स मिळणार – How to apply for Unique Health Card in Marathi :

डॉक्टरांना ओटीपी सांगितल्यानंतरच ते कार्डमध्ये नोंदलेली माहिती पाहू शकतील

हेल्थ कार्ड कसे तयार होईल ?
योजनेची घोषणा होताच गुगल प्ले स्टोअरवर एनडीएचएम हेल्थ रेकॉर्ड (पीएचआर अॅप्लिकेशन) उपलब्ध होईल. त्याद्वारे नोंदणी होईल. युनिक आयडी १४ डिजिटचा असेल.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, ते हेल्थ कार्ड कसे आणि कुठे तयार करू शकतील?
नोंदणीकृत सरकारी-खासगी रुग्णालये, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वेलनेस सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटर येथे कार्ड तयार होतील. तेथे सामान्य माहिती विचारली जाईल. उदा. नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर इत्यादी.

युनिक हेल्थ कार्डचा फायदा काय? – Benefits of Unique Health Card :

कार्डमध्ये आपल्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती डिजिटल फॉरमॅटमध्ये नोंदली जात राहील. संपूर्ण मेडिकल हिस्ट्री अपडेट होईल. त्यामुळे आपण एखाद्या रुग्णालयात उपचारासाठी गेलो तर आपले जुने सर्व रेकॉर्ड तेथेच डिजिटल फॉरमॅटमध्ये मिळेल. एवढेच नव्हे, तर आपण दुसऱ्या शहरातील रुग्णालयातही गेलो तरी तेथेही युनिक कार्डद्वारे डेटा पाहता येऊ शकेल. त्यामुळे डॉक्टरांना सहजपणे उपचार करता येतील. तसेच अनेक नवे रिपोर्ट्स किंवा प्राथमिक तपासण्या यात लागणारा वेळ आणि खर्च वाचेल.

कार्डमध्ये माहिती कशी नोंदली जाईल?
कार्ड तयार झाल्यानंतर मागील सर्व रिपोर्ट्स आपल्याला स्वत: स्कॅन करून अपलोड करावे लागतील. पण पुढील सर्व रिपोर्ट्स आपोआप अपलोड होत राहतील. उदाहरणार्थ-एखाद्या डिस्पेन्सरी किंवा रुग्णालयात आपली तपासणी होईल तेव्हा आपल्या युनिक आयडी कार्डमध्ये नोंदलेल्या १४ डिजिटच्या युनिक नंबरमार्फत हे रिपोर्ट््स कार्डशी लिंक होतील. रुग्णालयात एनडीएचएम कर्मचारी आपल्याला मदत करण्यास उपस्थित असतील.

कार्डमध्ये कोणकोणती माहिती असेल? What is Unique Health ID :

आपल्या मेडिकल रेकॉर्डशी संबंधित प्रत्येक माहिती त्यात नोंदली जाईल. उदा. गेल्या वेळच्या कोणत्या औषधांचा आपल्यावर परिणाम झाला की नाही? औषध बदलले तर ते का? त्यामुळे उपचार करताना डॉक्टरांना केस समजू शकेल.

दुसऱ्या शहरात डेटा कसा मिळेल?
डेटा रुग्णालयात नव्हे, तर डेटा सेंटरमध्ये असेल, तो कार्डद्वारे पाहता येईल. म्हणजे आपण कुठे उपचार करून घेण्यास गेलो तर ते आपल्यासाठी आधार कार्डसारखे महत्त्वाचे असेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for Unique Health Card in Marathi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या