21 May 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Special Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा

Carrot halwa recipe

मुंबई, ०७ जून | गाजराचा हलवा प्रत्येकाला आवडतो पण ह्याला बनवायचे असल्यास हे फार किचकट काम आहे पण आज आम्ही आपल्याला जी पद्धत सांगत आहो त्यामुळे गाजराचा हलवा चटकन आणि चविष्ट पद्धतीने तयार होईल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.

साहित्य:
1 किलो गाजर, 1 कप फुल क्रीम दूध, 1/2 बारीक चमचा वेलची पूड, 1 मोठा चमचा साजूक तूप, बारीक चिरलेले सुके मेवे, 50 ग्रॅम साखर.

कृती:
सर्वप्रथम गाजर सोलून सुरीने बारीक काप करा. गॅस वर कुकर ठेवून हे सर्व गाजराचे काप यामध्ये टाकून द्या आणि उकळलेले दूध देखील घाला. झाकण बंद करून चार शिटी येई पर्यंत शिजवून घ्या. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडून गाजर चांगल्या प्रकारे मॅश करून घ्या. जेवढ्या चांगल्या प्रकारे मॅश कराल गाजराचा हलवा तेवढाच चविष्ट होईल.

आता गॅस सुरू करून या मध्ये साखर, 25 मिली दूध आणि वेलची पूड मिसळून द्या. गोड जास्त प्रमाणात आवडत असेल तर आपण साखरेचे प्रमाण वाढवू देखील शकता. आता हे 8 ते 10 मिनिटे मध्यम आंचेवर ठेवून शिजवून घ्या. इच्छा असल्यास ह्यामध्ये खवा देखील घालू शकता. हलवा 15 मिनिटे ढवळल्यावर बाजूला ठेवून कढईत सुकेमेवे परतून घेऊ या.

या साठी कढईत साजूक तूप घालून वितळल्यावर या मध्ये काजू, बदाम आणि बेदाणे म्हणजे किशमिश सोनेरी रंगाचे होई पर्यंत तळून घ्या. सुकेमेवे चांगल्या प्रकारे तळल्यावर चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.
अशा प्रकारे चटकन चविष्ट गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. हे खाण्यात खूप चविष्ट आहे आपण नक्की हे करून बघा.

 

News English Summary: Everyone loves carrot halwa but if you want to make it, it is a very complicated task but the method we are telling you today will make the carrot halwa quick and tasty. So let’s learn the ingredients and the recipe.

News English Title: Carrot halwa recipe without grating special recipe news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x