18 August 2019 12:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम काश्मीरबाबत पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु; सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित मी तिथे होती, दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीवेळी कन्हैय्या कुमार तेथे नव्हता: भाजप खासदाराची पत्नी सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत; आम्ही सरकारी धोरणात हस्तक्षेप करतो, पण...... बहुमताच्या जोरावर शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही: बच्चू कडू ‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
x

आजपासून इंग्लंड-ऑस्ट्रेलियात ‘अ‍ॅशेस’ मुकाबला

आजपासून इंग्लंड-ऑस्ट्रेलियात ‘अ‍ॅशेस’ मुकाबला

लंडनः वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदानंतर इंग्लंड संघाने पारंपरिक अ‍ॅशेस मालिकेसाठी दंड थोपटले आहेत. गुरुवारपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाने अंतिम ११ सदस्यीय संघ जाहीर केला. पण, या संघात वर्ल्ड कपमधील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज जोफ्रा आर्चरला संधी मिळालेली नाही. त्याच्यासह सॅम कुरन आणि ऑली स्टोन यांना अंतिम अकरामध्ये स्थान पटकावता आलेले नाही. कर्णधार जो रूटने हा संघ जाहीर केला.

विश्वचषक स्पर्धेनंतर आता इंग्लंड संघ ही प्रतिष्ठेची मालिका जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. याअगोदर ऑस्ट्रेलियात झालेल्या या मालिकेत ऑस्ट्रेलियानेच बाजी मारली होती. त्या पराभवाची परतफेड करण्यास इंग्लंड संघ सज्ज होत आहे. विश्वचषक स्पर्धा जिंकल्यामुळे यजमान इंग्लंड संघाचे मनोधैर्य निश्चितच उंचावले आहे. कागदावर तरी त्यांचेच पारडे जड आहे. गेले काही वर्षे इंग्लंड संघाने आपल्या घरच्या मैदानावर सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तीच कामगिरी पुन्हा कायम राखण्यासाठी इंग्लंड संघातील खेळाडू उत्सुक आहेत.

मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ, उपकर्णधार वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज बँकक्रॉफ्ट यांच्यावर चेंडू कुडतडल्याप्रकरणी एक वर्षाची बंदी घातली होती. आता बंदी उठल्यामुळे हे तिघेजण प्रथमच ऑस्ट्रेलियाचे कसोटी सामन्यात पुन्हा प्रतिनिधीत्व करतील. या तिघांच्या कमबॅकमुळे ऑस्ट्रेलियाची ताकद मात्र वाढली आहे यात शंका नाही.

दरम्यान दुसरीकडे चेंडू फेरफार प्रकरणानंतर डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट ही त्रिमूर्ती प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे. टिम पेनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याची धुरा जेम्स पॅटिन्सन आणि पॅट कमिन्स सांभाळणार असल्याचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत तिसरा गोलंदाज म्हणून मिचेल स्टार्क, जोश हॅझलवूड आणि पीटर सिडल यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

८ गेल्या १८ वर्षांत ऑस्ट्रेलियाने एकदाही इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिका जिंकलेली नाही. २००१मध्ये स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये अखेरची अ‍ॅशेस जिंकली होती. ३३-३२ आतापर्यंत झालेल्या ७० अ‍ॅशेस मालिकांपैकी ऑस्ट्रेलियाने ३३, तर इंग्लंडने ३२ मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. पाच मालिका बरोबरीत सुटल्या आहेत.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Cricket(5)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या