30 April 2025 6:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

मेलबर्न: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारताने तिसरी कसोटी जिंकली

मेलबर्न : बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाने अखेरच्या दिवशी विजय प्राप्त केला. भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर तब्बल १३७ धावांनी विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, या सामन्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि सरत्या वर्षाचा अंत गोड केला आहे.

या तिसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच २६१ धावांवर ऑस्ट्रेलियाचा दणदणीत धुव्वा उडविण्यात आला आहे. या विजयामुळे २ दिवसांवर येऊन ठेपलेल्या नववर्षाची सुरुवात आणि सरत्या वर्षाचा शेवट टीम इंडियासाठी आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी गोड झाला आहे.

विजयासाठी ३९९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ केवळ १३५ धावांवर माघारी परतला होता आणि खेळपट्टीची गोलंदाजांना मिळत असलेली साथ पाहता उर्वरित फलंदाज सुद्धा झटपट तंबूत परततील अशी खेळपट्टी वाटू लागली होती. सामन्यातील अखेरच्या म्हणजे पाचव्या दिवशी टीम इंडियाने काही षटकांमध्येच ऑस्ट्रेलियाच्या उर्वरीत फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यामुळे २६१ धावांवर संपूर्ण संघ गारद झाला आणि भारताने १३७ धावांनी दुसरी कसोटी जिंकत मालिका सुद्धा जिंकली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या