17 May 2021 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू हट्टी मोदी सरकार वैज्ञानिकांचे सल्ले देखील ऐकत नाहीत | डॉ. जमील यांचा कोरोना सल्लागार गट प्रमुख पदाचा राजीनामा
x

सरकार चीन-पाकिस्तानला घाबरत नसल्याचा अभिमान होता | पण हे तर रिहानाच्या ट्विटला घाबरले

Stand up comedian, Vikram Sathaye, Modi government, Rihanna tweet

मुंबई, ०५ फेब्रुवारी: रिहानाच्या ट्विटनंतर भारतातील वातावरण ढवळून निघालं असून जगभरात शेतकरी आंदोलन चर्चेचा विषय बनला आहे. त्यात २ महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असताना देखील भारतातील सेलिब्रेटी शांत असल्याचं पाहायला मिळालं. त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन देखील प्रतिष्ठित व्यक्ती तोंड उघडत नव्हते. मात्र मोदी सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरातून टीका होताच बॉलिवूड सहित अनेक क्रिकेटर्स झोपेतून जागे झाल्याचं पाहायला मिळालं. एकानेही शेतकऱ्यांची बाजू न घेता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोदी सरकारची तळी उचलल्याचे पाहायला मिळले. त्यानंतर देशभरातुन संबंधित क्रिकेटर्सवर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यात सचिन तेंडुलकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी जुने संदर्भ देखील दिले जात आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

बारबाडोसमध्ये जन्मलेल्या रिहानानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर भारतात देखील त्याचे पडसाद उमटले. यावरून अभिनेता अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, लता मंगेशकर, अजय देवगण आणि सायना नेहवालने ट्विट करण्यास सुरुवात केली. यामध्ये अजय देवगण सध्या केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू अँपचा अँबेसिडर आहे. अक्षय कुमार एक अघोषित मोदी भक्त आहे. लता मंगेशकर यातर मोदींना मोठे बंधू मानतात आणि अमित शाह यांनी भाजपच्या ‘संपर्क पे चर्चा’ अभियानावेळी तर लता दीदींच्या घरी विशेष भेट दिली होती. तर विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे बीसीसीआय’शी संबंधित असल्याने आणि अमित शहा यांचे पुत्र जय शहा सध्या बीसीसीआय’चे सचिव आणि अघोषित सर्वेसेवा झाले आहेत. यावरून कोहली आणि अर्जुन तेंडुलकरच्या भविष्यासाठी सचिनची अवस्था समजू शकतो. त्यात सायना नेहवाल’ने तर अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या ट्विटमधील फोटो अक्षय कुमारने आपल्या हँडलवरुन शेअर केला आणि तिकडूनच सर्व सुरुवात झाली. त्यानंतर याच सर्व भारतीय सेलिब्रिटींवर जोरदार टीका सुरु झाली आहे. त्यात अनेकांनी मोदी सरकारला देखील लक्ष केला आहे. याच विषयाला नुसरून स्टॅन्डअप कॉमेडियन आणि क्रिकेट विनोदक विक्रम साठे यांनी ट्विट करून भारत सरकारची खिल्ली उडवली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “अभिमान होता की सरकार चीन आणि पाकिस्तानला घाबरत नाही…पण खरंच हे पाहून निराश झालो की ते रिहानाच्या ट्विटला घाबरले आणि सेलिब्रेटींना तसेच मेसेज करायला सांगत आहेत…रिहाना आपलं ऐक्य कसं तोडू शकते…भारत एवढा कमकुवत आहे?

 

News English Summary: Was proud when government was not scared of Pak and China amd took them on . Really disappointed that they got scared of Rihanna and got celebrities to post the same message. How can Rihanna break our sovereignty, is India so weak ? said Vikram Sathaye.

News English Title: Stand up comedian Vikram Sathaye slams Modi government over Rihanna tweet on farmers protest news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(108)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x