6 December 2024 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Bikes | बजाज कंपनीच्या बाईक खरेदीसाठी शोरूमबाहेर मोठी गर्दी; 30 दिवसांत तब्बल 4 लाखांहून अधिक गाड्यांची विक्री Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, अशी संधी सोडू नका - Penny Stocks 2024 IRFC Share Price | IRFC सहित 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News
x

TTML Share Price | शेअर प्राईस 3 रुपयांवरून 96 रुपयांवर आली, दिला 3800% परतावा, पुढे किती कमाई होईल?

TTML Share Price

TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना 3800 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे (NSE: TTML) शेअर्स 95.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली होती. (टीटीएमएल कंपनी अंश)

टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 111 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 65 रुपये होती. शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 1.13 टक्के वाढीसह 96.89 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील पाच वर्षांत टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3800 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 मध्ये हा स्टॉक 96 रुपये किमतीवर पोहचला आहे. टीटीएमएल ही कंपनी मुख्यतः कनेक्टिव्हिटी, क्लाउड, सुरक्षा, IoT आणि मार्केटिंग सोल्यूशन्ससह विस्तृत सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

याव्यतिरिक्त, टीटीएमएल कंपनी भारतातील उद्योगांना टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस ब्रँड नावाखाली ICT सेवा प्रदान करते. जून तिमाहीत टीटीएमएल कंपनीला 323.40 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 301.18 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

टीटीएमएल कंपनीचा परिचालन महसूल वार्षिक 13.31 टक्के वाढून 323.50 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जून तिमाहीत टीटीएमएल कंपनीचा EBITDA 8.91 टक्के वाढून 138.53 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील पाच वर्षात टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 3875.00 टक्के वाढली आहे. या स्टॉकने परतावा देण्याच्या बाबतीत बीएसई टेलिकम्युनिकेशन्स आणि बीएसई टेक या बेंचमार्क निर्देशांकांना मागे टाकले आहे.

हे दोन्ही इंडेक्स याच काळात अनुक्रमे 261.39 टक्के आणि 155.04 टक्के वाढले आहेत. मागील तीन वर्षांत टीटीएमएल स्टॉक 160.03 टक्के मजबूत झाला आहे.

News Title | TTML Share Price NSE: TTML 31 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x