आई म्हणजे आई
वात्सल्याची दाई
प्रेमाची शाई
अशीच असते आई….

मुलांची तळमळ बघून
अश्रू गाळणारी आई
पोटच्या मुलाच्या सुखासाठी
“स्व” अपेक्षांचे बलिदान देणारी आई….

जन्मल्या पासून एका
फुला प्रमाणे जपणारी
भरारीचे पंख फड्कवतांना
डोळे भरून पाहणारी आई….

आजारी पडल्यावर रात्र
रात्रभर उशाशी बसणारी
मुलांची पोट भरून स्वतः
अर्धपोटी निजणारी आई….

मुलांच्या सुखी आयुष्याची
तोंड भर स्तुती करणारी
सुनेलाही मुली सारखी
वागणूक देणारी आई….

खरच आईला जे जमत
ते कुणालाच जमत नाही
आई विना काहीच नाही
आई पुढे देव ही लागत नाही….

 

लेखक: पियुष खांडेकर

!! आई म्हणजे आई !!