मला कुठलीही पूर्व कल्पना न देता
आज अंधारात तो अचानक आला..
तशी नित्यानुसार गळा भेट झालीच
पण एकदम येऊनही वेगळा वागला..
म्हटल असेल काही बिनसल सांगेल
खांदा घेऊन माझा तिर्डीवर झोपला..
क्षणभराची ओल न् लपंडाव विजेचा
उगाच जणू हळदीचे बोट वैधव्याला..
येऊन जातांना काही वाटलं नसेलच
पाठीमागे उरलेलं दिसलं पण थेंबाला..
मग भिजलो, त्याच्यासह एकत्र अन्
तो भेटून, खेटून गेला आज रात्रीला..
पाऊस आज माझ्या स्मशानातल्या-
वाळवंटावर माती ओली करुन गेला..!

 

लेखक: पियुष खांडेकर

पहिला पाऊस..!