तू शांत झोपली असतेस
तेव्हा ना फार बरं वाटतं..
माझ्या जवळ असलेलं
तुझं अस्तित्व खरं वाटतं..
कितीतरी युगांनी बघावे तुला
तसं मी एकटक बघत बसतो,
किलकिले डोळे उघडतेस तेव्हा,
श्वासांचा जीव भांड्यात पडतो…
मग स्वतःत मग्न असलेला दिवस
प्रेमाचा होऊन धावत राहतो..
..तुझ्या दिशेने, तुझ्या ओढीने..!

लेखक: पियुष खांडेकर

तुझ्या ओढीने..!