गिफ्ट

अशोक हा मध्यमवर्गीय कुटुंबातील मोठा मुलगा. वडिलांचा वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय. घरी आई-बाबा, अशोक आणि एक बहीण सिमा, अस चौकोनी कुटुंब. वडिलांचा स्वभाव अतिशय व्यावसायिक आणि नीटनेटका. त्यामुळे घरात अनावश्यक वस्तूंचा वापर वर्ज्य. गरजेपक्षा जास्त काहीच नसायचं, त्यामुळे आहे त्यात भागवायची आणि समाधानी राहण्याची सवय अशोक आणि सीमाला लहानपणापासून होती. आता अश्या वागण्यामागे एक कारण हेही होतंच कि यापेक्षा जास्त पैशांचा भार मध्यमवर्गीयांना पेलवत नाही. पण असं हे साने कुटुंब सुखी आणि समाधानी होतं.
अशोक लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. नेहमी वेगळं काही करण्याकडे त्याचा कौल असायचा. अगदी वर्गात पहिला नसला तरी पहिल्या पाच मध्ये त्याचा समावेश असायचा. पण तरीही तो शाळेत नेहमी चर्चेत असायचा तो त्याच्या विविध पर्यावरणविषयक प्रकल्पामुळे. शालेय अभ्यासक्रमात प्रकल्पाचा समावेश केल्यामुळे अशोक च्या सुप्तगुणांना वाव मिळत होता. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे, बायोगॅस , कंपोस्ट खत असे अनेक प्रकल्प अशोक बनवायचा. तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्याने अनेक बक्षीसही मिळवली होती. मेहनत आणि त्यासोबत तल्लख बुद्धी यामुळे अशोक सर्वांचा लाडका होता.
पुढे अशोकने हॉटेल मॅनेजमेंट मध्ये डिग्री मिळवली. आणि लगेचच त्याला एका नामवंत खासगी कंपनी मध्ये नोकरी मिळाली.सगळं अगदी स्वप्नवत घडत होत.दर महिन्याला भरगोस पगार हाती येऊ लागला. पण मूळचाच काटकसरी स्वभाव असल्यामुळे अशोक लागेल तेवढेच पैसे वापरायचा आणि बाकी सगळे वडिलांना पाठवायचा. अशोकाच्या घरी अजूनही तसंच वातावरण होत. त्याच्या वडिलांनी त्यांचा दंडक कायम ठेवला होता आणि आजही त्यांच्या शब्दांना तेवढाच मान होता. त्यामुळे अहंकार आणि उधळेपणा यापासून ते कुटुंब फार दूर होत.
अशोकला नोकरी करून दोन वर्ष झाली होती. इथेही त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर चांगलीच छाप सोडली होती. त्याच्या तल्लख बुद्धीला मार्केटिंगचा पूर्ण अंदाज आला होता,त्यामुळे ती नोकरी त्याला चौकटीबंध वाटायला लागली. यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा त्याचा ध्यास होता आणि सरतेशेवटी त्याने त्या नोकरीचा राजीनामा दिला. आजूबाजूच्या लोकांनी अशोकला मूर्खात काढलं. पण त्याच्या कुटुंबियांना अशोक वर पूर्ण विश्वास होता त्यामुळे ते याही निर्णयात त्याच्या सोबत होते. अशोक नक्कीच काहीतरी कौतुकास्पद करेल याची त्यांना खात्री होती, हा विश्वास अशोकसाठी खूप महत्वाचा ठरला.
खूप विचार आणि कामाची आखणी करून त्याने wedding planner होण्याचा निर्णय घेतला. सोबत लागणारे कर्मचारी, ऑफिस साठी जागा, भांडवल आणि इतर सर्व गोष्टींची जुळवणी केली आणि शेवटी शुभमंगल हे नवंकोर ऑफिस थाटात उभं झालं.अशोकाचा नवा प्रकल्प. अतिशय रास्त दर आणि त्यासोबत तितकांच विलोभनीय अनुभव हे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य. अशोकने त्याच्या नवीन नवीन कल्पनांनी अनेक लग्नाचे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले, त्यामुळे या क्षेत्रात त्याने लवकरच खूप नाव मिळवलं. सजावट, जेवण, वऱ्हाडी लोकांची राहण्याची सोय याकडे अशोक स्वतः लक्ष द्यायचा. त्यामुळे कुठल्याच ग्राहकाला त्याच्याकडून तक्रार नव्हती. सगळे विधीसोहळे शास्तोक्त पद्धतीने पार पाडण्यावर त्याचा भर असायचा त्यामुळे मंगल सोहळा खऱ्या अर्थानी शुभ वाटायचा.
सगळे अशोकाच्या या संकल्पनेवर खुश होते. सगळीकडे याच कौतुक होत होत. लग्न म्हटलं कि सगळे आपल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करतात. उरलं तरी चालेल पण कमी पडायला नको असा वधूपक्षाचा आग्रह असतो. त्यामुळे नेहमी पंचपक्वानांची भरगोस मेजवानी करण्याची आपली रीत आहे. पण हिच गोष्ट अशोकला खूप खटकायची.लग्नात आलेली मंडळी बुफे मध्ये ताट वाढून घेतांना आपल्या भुकेचा अंदाज न घेता ताट वाढून घ्यायचे आणि परिणामी ते अन्न उष्ट राहायचं, मग काहीही विचार न करता सरळ ते अन्न कचरापेटी मध्ये टाकायचे. रोजच्या लग्नात होत असलेली अन्नाची अशी नासधूस अशोकला पाहवत नव्हती. त्याने लग्नघरी या विषयावर चर्चाही करून बघितली पण “अहो एकदाच होणार आहे लग्न, त्यामुळे सगळं कसं मोठ्या थाटामाटात व्हायला हवं, आणि पाहुण्यांना कमी वाढून घ्या अस म्हणणं बर दिसत का? आणि सगळेच कुठे असं करतात? असू द्या.” अस बोलून हि चर्चा अशीच थांबून जायची. याही पुढे जाऊन काही लोकांच असही मत होत कि “माझेच पैसे जात आहेत नं, जाऊ दे जातंय वाया तर. तू तुझं काम कर” ..
अशोक यावर सतत विचार करत होता. आणि शेवटी एक कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्याने लगेच आपल्या कर्मचाऱ्यांना बोलावून याबाबद्दल माहिती दिली आणि पुढल्या इव्हेण्ट(event) मध्ये त्याची अंमलबजावणी करायचं ठरवलं.
झालं, तो दिवस उजडला. रात्रीचा रिसेप्शन चा मोठा कार्यक्रम होता. भव्य रोषणाई, सगळीकडे खुर्च्या, सुबक स्टेज , नैसर्गिक फुलांची सजावट यामुळे वातावरण अजूनच प्रफुल्लित वाटत होत. कार्यक्रम छान रंगात आला होता. सगळ्या पाहुण्यांनी वधूवरांना शुभेच्छा दिल्या, भेटवस्तू दिल्या. त्यानंतर सगळी मंडळी जेवणाकडे वळली. अशोक सगकीकडे जातीने लक्ष देत होता.
नेहमीप्रमाणे बऱ्याच पाहुण्यांनी गरजेपेक्षा जास्त वाढून घेतलं होतं आणि तेवढं ते खाणारच नाहीत हे स्पष्ट दिसत होत. पण तरीही गप्पा करत सगळ्यांची जेवण सुरु होती. थोड्यावेळाने एक मध्यम वयाची बाई तिची जेवणाची प्लेट घेवून डस्टबिन कडे गेली. आज एक अशोक नी नवीन सोय केली होती ती म्हणजे आज प्रत्येक डस्टबिन जवळ त्याचा कर्मचारी उभा होता. त्या बाईच्या ताटात अनेक पदार्थ उरले होते, काहितर अगदी घेतले तसेच होते. अशोक तिच्या मागे गेला.ती बाई प्लेट डस्टबिन मध्ये टाकणारच एवढ्यात अशोकनी तिला आवाज दिला,
“excuse me mam”
तिने मागे वळून बघितलं,
” मी ह्या इव्हेण्ट चा प्लॅनर अशोक साने”
अतिशय सौम्य शब्दात त्याने स्वतःची ओळख करून दिली.
“नमस्कार” थोडं गोंधळून च त्या बाईने प्रतिसाद दिला.
“आम्ही एक नवीन संकल्पना राबवत आहोत, अर्थातच त्यासाठी आम्हला तुमची मदत लागेल, आपण आपल्या गरजेपेक्षा थोडं जास्त अन्न घेतलंय त्यामुळे ते उरलं. पण हे अन्न अजूनही चांगलं आहे, जर आपली हरकत नसेल तर आम्ही हे उरलेलं अन्न आपल्याला व्यवस्थित पॅक करून देऊ का? हे आमच्याकडून आपल्याला छोटीशी भेट. आपण घरी गेल्यांनंतर याचा वापर करू शकता. जसं आपण घरच्या जेवणाचा करतो. आणि या सगळ्यांमध्ये लग्नघरच्यांनाचा काहीही संबंध नाही. हि पूर्णतः माझी कल्पना नाही. जरी आपल्याला आवडली नसेल तर कृपया त्यांना काहीही बोलू नका”
चेहऱ्यावरचं मंद स्मित जराही ढवळू न देता आणि त्या बाईला काहीही वाईट न वाटू देता त्याने त्याचा विचार मांडला.
ती बाई चकित होऊन अशोक कडे बघू लागली. दोन मिनिटं झालेल्या घटनेचा तिने पुन्हा विचार केला. आणि तिची प्लेट अशोक कडे देत तिने ” हो, चालेल ” म्हणून होकार दिला. अशोकला अतिशय आनंद झाला. त्याने लगेच ती प्लेट घेऊन कर्मचार्यांकडून उरलेलं अन्न वेगवेगळं अगदी गिफ्टसारखं पॅक करून आणलं,त्यावर मजकूर होता ” Thank you” आणि त्या बाईला दिलं.
“अगदी मनापासून धन्यवाद मॅडम”
“अहो धन्यवाद काय म्हणताय ,खरं तर मीच सॉरी. कळतं नकळत मी चूक करत होते, आणि बरेचदा करत होते. पण तुमची संकल्पना आवडली. Thank you Mr….”
“अशोक”
हसतच अशोकने तिला आपल्या नावाची आठवण करून दिला. त्यांनतर अशोक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास सगळ्या पाहुण्यांना अशी अनोखी भेट दिली. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे यातल्या अर्ध्या अधिक पाहुण्यांनी ती आनंदाने स्वीकारली तर काही जणांनी लाज बाळगून. पण त्या दिवशी ताटातील थोडं सुद्धा अन्न वाया गेलं नाही. जो स्वयंपाक उरला होता एका गरीब वस्तीमध्ये वाटून दिल्या गेला.
आज अशोकनी साधंच पण खूप महत्वाचं पाऊल उचललं होत. संकल्पना जरी साधी असली तरी त्याचे परिणाम खूप मोठे आहेत. एकीकडे कित्येक लोक उपाशी झोपतात तर त्याच वेळी कितीतरी अन्न वाया जात असतं. हि विसंगत स्थिती अशोक ला बदलायची होती. त्याच्या नवीन प्रोजेक्ट मुळे त्याच सर्वच स्तरावर कौतुक झालं. पण याचा पुढे आणखी एक सकारात्मक परिणाम घडला तो म्हणजे पाहुणे मंडळी ताटात हवं तेवढंच अन्न घेऊ लागली!! आणि तरीही काही अन्न उरलंच तर ते गिफ्ट म्हणून घेत होती.
खरंच एक गिफ्ट असंही… कल्पने पलीकडचं… मला आवडलेलं
Writer: Tejal Apale
Marathi Laghu Katha Title: Marathi Laghu Katha GIFT written by Tejal Apale on Maharashtranama.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER