प्रायश्चित्त....!

काही दिवसांपासून पाऊस माझ्याशी खेळ करत आहे, मी कुठे अडकला असतो तेव्हा बाहेर मनसोक्त बरसत आहे, त्याची माझी हल्ली चूकामुकच होत आहे, मला भेटायची ओढ त्यालाही नसेल का?? मी भेटत नाही म्हणून कदाचीत एकटाच रडत नसेल का?
त्याची चाहूल लागून भेटायला येईल मी अशी खुळी अशा तो ठेवत नसेल का? जसे पावसासाठी आपण तरसतो आपल्यासाठी तो तरसत नसेल का? खुळ्या मनाचे खुळेच विचार… माणसांसारखा तोही स्वार्थी झाला असेल… आपापल यायचं बरसायच अन निघून जायचं… जेव्हढे आपल्या थेंबात एकवटले तेव्हढे क्षण एकवटून घेऊन जायचं…आणि जेव्हढे निसटले त्याचं प्रायश्चित्त कधीतरी कुठल्याश्या क्षणात करत बसायचं…
बरसत असतो मी तेव्हा प्रत्येकाला कोणी ना कोणी आठवत राहतो… बहुतांश रोमॅन्स, शाळा, कॉलेजची कॅंटीन, चौपाटीवरची भेळ…आणि काय काय…
बाहेर रिपरिप सुरु असते तेव्हा माझ्या मनात खूप राग येतो… एकदाचा मुसळधार कोसळ आणि बंद हो… पण नंतर एक विचार मनात येतो आपल्याला आपल डोक लपवायला निदान घर तरी आहे अथवा ऑफिसचे छत… पण रोडवर राहणार्या गरिबांच काय… मुंबई सारख्या धारावी झोपडपट्टीत राहणार्या लोकांच काय… एक मुंबईतच झोपडपट्टी आहे अस नाही… प्रत्येक गावाचा, शहराचा, जिल्ह्याचा एक अविभाज्य घटक आहे झोपडपट्टी… ज्या छिद्र पडलेल्या कौलांच्या झोपडीत दोन वेळच जेवण शिजनही कठीण असत त्या घरात रिपरिपणारा पाऊसही किती थैमान घालत असेल…
कौलांच्या छिद्रातून घरात येणार्या पावसाच्या थेंबांना एकवटायला घरातल एक जर्मनच भांड लावलं जात… भांड भरलं का ते पाणी बाहेर फेकून पुन्हा त्याच छीद्राखाली लावलं जात… पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही… थांबेल थांबेल म्हणत संध्याकाळच्या जेवणाची वेळ होते आणि जेवण शिजवायच भांड त्या छिद्रखाली सापडलं असत… दुसर पर्यायी भांड त्या गरीब घरात कोणतच नसत… आणि आपण बस… पडतोय पड रे बाबा पड खूप गरम होतंय तेव्हढाच गारवा तरी मिळेल या अनुषंगाने पावसाचे कृत्यार्थ होऊन जातो…
अन पाऊस न बरसता प्रायश्चित्त करत राहतो… एक दिवस तरी विना पावसाचा दिलासाच त्या झोपडीतल्या नाट्याला देत राहतो… पाऊसही कधीकधी आपल्या थेंबांना आवर घालत असतो… अन कुठेतरी क्षणभरचा दिलासा देत राहतो… पुन्हा नवीन दिवस… नवा पाऊस जुनेच नाट्य अन जुनेच श्रोते…. नव्याने….
लेखक: पियुष खांडेकर
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL