4 May 2025 6:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

!! ओंजळीत माझ्या !!

Marathi Poetry, Onjalita Majhya, written by Piyush Khandekar

नात्यांचे नाजूक धागे
प्रेमाने गोंजारले तिने
सोबत देऊन तिला
माझे नवे जीवन गाणे

तुरु तुरु चालत
येते मिठीत माझ्या
तोतळ्या बोलांनी
गुंतवते मनास माझ्या

आहे थोडीशी खट्याळ
पण गोष्टी करते समजुतादारीच्या
मोठ्यांना सुद्धा खडसावून सांगते
महत्व आनंदी क्षणांच्या

सावली सारखी सोबत
मागे पुढे तिची बाहुली
शोधू कुठे तिला
जगाला या रुसून बसली

जीवन तरी जगणे चालू आहे
भेटेल तिच्या सारखे कोणी
पण त्या वेडीला नाही समजले
हृदयात तिची जागा नाही घेवू शकणार कोणी

ओंजळीत ठेवून गेली माझ्या आठवणी
हृदयाच्या चोर कप्प्यात तिच्याच आठवणी
का असा देव दुष्ट व्हावा
ओंजळीनेच तिच्या प्रेताला मुठ-माती मागवा !!

लेखक: पियुष खांडेकर

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या