15 December 2024 10:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

२३ ज्येष्ठ नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र | काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता

23 Congress Leaders, Call For Changes, Sonia Gandhi

नवी दिल्ली, २३ ऑगस्ट : मागील काही वर्षांपासून बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमध्ये फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या निवडीला वर्ष झालं असून, काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाला उभारी देण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणीही या नेत्यांनी केली आहे.

या पत्रात संबंधित नेत्यांनी गेल्या सहा वर्षात भाजपने चांगली कामगिरी केल्याची कबुली दिली आहे. देशातील तरुण नरेंद्र मोदी यांनाच मत देत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यात घट होत असून तरुणांचा पक्षावरील विश्वास उडत चालला आहे. ही चिंतेची बाब असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. हे पत्र पाठवणाऱ्या २३ नेत्यांमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, शशी थरुर, खासदार विवेक तनखा, मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, संदीप दीक्षित, भुपिंदर सिंह हुडा आदी नेत्यांचा समावेश आहे.

प्रसार माध्यमांना काँग्रेसच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, साधारण १५ दिवसांपूर्वी हे पत्र सोनिया गांधी यांना पाठवण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी असावी, यासाठी पर्यायही सुचवण्यात आले आहेत. त्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत याचे काय पडसाद उमटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या पत्रात काँग्रेस पक्षाला प्रभावी आणि पूर्णवेळ नेतृत्त्व मिळावे, असेही सांगण्यात आले आहे. हे नेतृत्त्व लोकांच्या नजरेत राहणारे आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे असावे. भविष्यात पक्षाने एकसंधपणे वाटचाल करण्यासाठी संस्थात्मक नेतृत्त्व अत्यंत महत्त्वाचे असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.

 

News English Summary: SIX years after the party’s electoral rout pushed it into a continuing downward spiral, 23 senior leaders of the Congress, including five former Chief Ministers, many Congress Working Committee members, sitting MPs, and several former Union Ministers, have, in an unprecedented pushback, sent a letter to party chief Sonia Gandhi calling for sweeping changes, from top to bottom.

News English Title: 23 Congress Leaders Call For Changes In Party Write To Sonia Gandhi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)#SoniaGandhi(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x