4 December 2022 7:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 5 ते 11 डिसेंबर | 12 राशींसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशिबाची साथ कोणाला? Lakshmi Narayan Raj Yog | लक्ष्मी नारायण राजयोग उजळणार या राशींच्या लोकांचे भाग्य, प्रत्येक कामात यश मिळेल, तुमची राशी? एक 'सोंगाड्या' आहे जो सकाळी भगवा आणि दुपारी हिरवा असतो, मनसेच्या गजानन काळेंचा धार्मिक टोला कोणाला? Fast Money Share | हा शेअर एकदिवसात 20 टक्के वाढतोय, स्टॉक वाढीचे कारण काय? हा स्टॉक खरेदी करणार? Mutual Fund Calculator | 5000 ची SIP बनवते करोडपती, SIP गुंतवणुकीचे फायदे वाचा, पैसे गुणाकार गणित समजून घ्या Numerology Horoscope | 04 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Horoscope Today | 04 डिसेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Aadhaar Card Updates | तुमची आधार सेवा केंद्रात जाण्याच्या त्रासातून सुटका होणार | कारण जाणून घ्या

Aadhaar Card Updates

Aadhaar Card Updates | आता आधार कार्डाशी संबंधित जे काही काम असेल, ते घरी बसूनच असेल. त्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात फिरावे लागणार नाही. युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया ही सेवा घरपोच देण्यासाठी वेगाने काम करत आहे. ही सुविधा लागू होताच घरबसल्या मोबाइल नंबर अपडेट करणं, पत्ता बदलणं अशा सगळ्या अपडेट्स तुम्हाला घरबसल्या करता येणार आहेत.

म्हणजेच या सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आता आधार सेवा केंद्रात जाण्याची गरज भासणार नाही. रिपोर्टनुसार, सध्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक 48 हजार पोस्टमनना ट्रेनिंग देत आहे. त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरबसल्या आधारसंबंधी सुविधा मिळू शकतील.

पोस्ट ऑफिसर तांत्रिक सुविधा आणि प्रशिक्षण देण्यात येणार :
एका रिपोर्टनुसार, 1.50 लाख पोस्टल ऑफिसरना प्रशिक्षण देण्यात येणार असून याद्वारे भविष्यात कोणतीही व्यक्ती घरबसल्या आधारशी संबंधित सर्व कामे करू शकणार आहे. प्रशिक्षणाबरोबरच या प्रक्रियेत आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियातर्फे पोस्टमनला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

लॅपटॉपसारख्या सर्व डिजिटल सुविधा पुरवणार :
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया पोस्टमनना लॅपटॉपसारख्या सर्व डिजिटल सुविधा पुरवणार आहे, जेणेकरून त्यांना आधार कार्डशी संबंधित सर्व अपडेट करता येतील. यासोबतच पोस्टमनना मुलांची नोंदणीही करता येणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विस्तार योजनेचा हा एक भाग आहे.

सुविधा विस्ताराची सर्वसमावेशक योजना:
याशिवाय आधारशी संबंधित माहिती अपडेट करून घेण्याची तसदी लोकांना पडू नये, यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) देशभरातील सर्व ७५५ जिल्ह्यांमध्ये आधार सेवा केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) सध्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कॉमन सर्व्हिस सेंटरसोबत काम करणाऱ्या सुमारे १३ हजार बँकिंग करस्पॉडंटना जोडण्याचीही योजना आखत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aadhaar Card Updates check details 13 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x