19 March 2024 4:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | अवघ्या 21 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करा, खरेदीनंतर संयम मोठा परतावा देईल RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले Zomato Share Price | पैशाने पैसा वाढवा! झोमॅटो शेअर 200 टक्केपर्यंत परतावा देईल, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Paytm Share Price | सुवर्ण संधी! 63 टक्क्यांनी स्वस्त झालेला पेटीएम शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राइस जाणून घ्या DroneAcharya Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय हा शेअर, वेळीच खरेदी करा, ऑर्डरबुक मजबूत झाली Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Reliance Infra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! रिलायन्स इन्फ्रा शेअरने 2 दिवसात 20 टक्के परतावा दिला, खरेदी करावा
x

'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान

Mission Chandrayan 2, ISRO, PSLV, apj abdul kalam award, scientist sivan

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले चांद्रयान-2 मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सिवन यांचा गौरव केला आहे. चांद्रयान-2 या मोहिमेचं सिवन नेतृत्व करत आहेत. इस्रोचं अध्यक्षपद सांभाळणाऱ्या सिवन यांची कहाणी ही संघर्षमय आहे.

विज्ञान क्षेत्रातील प्रगती, तसेच मानवी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरवण्यात येते. तामिळनाडू सरकारच्यावतीने तामिळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्ण पदक आणि पाच लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

के सिवन यांचे बालपण अतिशय खडतर परिस्थितीत गेलं. त्यांनी तामिळनाडूतील एका सरकारी शाळेतून तामिळ भाषेतून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना ते शेतात आपल्या वडिलांचीही मदत करत असत. याच कारणामुळे त्यांना आपल्या घराजवळच असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला होता. त्यांनी गणित हा विषय घेऊन आपलं बीएससीचं शिक्षण पूर्ण केलं.

हॅशटॅग्स

#PSLV(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x