High Speed Internet | एलन मस्क यांच्या स्टारलिंककडून प्री-बूकिंगला सुरूवात
मुंबई, ०२ मार्च: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आणि सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली. मोठ्या प्रतीक्षेनंतर टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्स भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. टेस्ला कंपनीने कर्नाटकमधील बंगळुरु येथे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची नोंदणी केली आहे. कंपनी बंगळुरुत लक्झरी इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती आणि विक्री करणार आहे. कंपनीने बंगळुरुत कामाला सुरुवातदेखील होणार आहे.
मात्र आता एलन मस्क यांची स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉरपोरेशन (SpaceX) स्टारलिंक प्रोजेक्ट भारतात आणणार आहे. कंपनी भारतीय टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करणार आहे. SpaceX भारतात सुरुवातीच्या काळात 100 Mbps सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्व्हिस देणार आहे. या तयारीनिशी कंपनी भारतात उतरण्याची शक्यता होती. 1 ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ असलेल्या भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये मस्क आपल्या कंपनीचा विस्तार करणार आहेत. मात्र आता कंपनीने याच क्षेत्रात अधिकृतपणे उतरण्यास सुरुवात केली आहे. (Pre booking for Starlink Internet is currently underway)
प्री-बूकिंगसह रजिस्ट्रेशनला सुरूवात:
भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी Starlink इंडियाची वेबसाइट लाइव्ह झाली असून बूकिंगलाही सुरूवात झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतात स्टारलिंकची इंटरनेट सेवा 2022 मध्ये सुरू होऊ शकते. मात्र, कनेक्शन घेण्यासाठी प्री-बूकिंगला सुरूवात झाली आहे. https://www.starlink.com/ या लिंकवर जाऊन तुम्ही प्री-बूकिंग करु शकतात. स्टारलिंक इंटरनेटसाठी प्री-बूकिंग सध्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये सुरूवात झाली आहे. (Starlink’s internet service in India could start in 2022)
किती असणार दर?
प्री-बूकिंगसाठी 99 डॉलर म्हणजे जवळपास 7 हजार 300 रुपये सिक्युरिटी म्हणून द्यावे लागतील, हे पैसे राउटर आणि अन्य बाबींसाठी असतील. पेमेंट झाल्यानंतर तुमच्या लोकेशनवर बूकिंग कन्फर्म होईल. सिक्युरिटी म्हणून दिलेले पैसे १०० टक्के रिफंडेबल आहेत, म्हणजे बूकिंग केल्यानंतरही तुम्ही बूकिंग रद्द करु शकतात, तुम्हाला सर्व पैसे परत दिले जातील.
स्पीड किती ?
दरम्यान, सुरूवातीला बीटा टेस्टिंगदरम्यान ग्राहकांना 50-150Mbps चा स्पीड मिळेल. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर 300Mbps पर्यंत स्पीड मिळेल असं मस्क यांनी यापूर्वी सांगितलं होतं. Starlink द्वारे जगभरात इंटरनेट सेवा देण्याची मस्क यांची योजना आहे.
News English Summary: Starlink India’s website has gone live to provide internet services in India and bookings have also started. According to reports, Starlink’s internet service in India may start in 2022. However, pre-booking has started to get the connection. You can pre-book by visiting this link https://www.starlink.com/. Pre-booking for Starlink Internet is currently underway in Delhi, Mumbai, Kolkata, Chennai, Hyderabad and Bangalore.
News English Title: Pre booking for Starlink Internet is currently underway news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News