15 December 2024 6:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

मतदारसंघात गुजरात्यांकडून मराठी ब्राह्मण कुटुंबियांना मारहाण होऊनही भाजप आ. संजय केळकर शांत

MLA Sanjay Kelkar, Paithakar Family beaten by Gujarati family, Raj Thackeray, MNS, Avinash jadhav

ठाणे : शहरातील नौपाडा परिसरातील पैठणकर या मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते. लिफ्टचा दरवाजा चुकून अर्धवट उघडा राहिल्याच्या शुल्लक चुकीमुळे नौपाड्यातील पैठणकर या मराठी ब्राम्हण कुटुंबियांना हसमुख शहा या गुजराती पिता-पुत्राने अत्यंत खालच्या भाषेतील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

दरम्यान, सदर प्रकार समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नौपाडा भागात मराठी कुटुंब मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत असताना अशाप्रकारे मराठी कुटुंबाला मारहाण होणं हे अत्यंत दुर्दैव असल्याचं म्हटलं आहे. स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हसमुख शहा यांना शोधण्यासाठी गेले असताना त्यांनी घराचा दरवाजाच उघडला नाही. विशेष म्हणजे 5 दिवसांपूर्वी सदर घटना घडली तरी देखील आजपर्यंत हसमुख शहा याच्यावर ना गुन्हा दाखल झाला आहे ना अटक आणि त्यामुळे येथे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

यावर तीव्र प्रतिक्रिया देताना मनसेचे अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे की, हसमुख शहा जिथे कुठे भेटेल त्याला मारल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही. मराठी माणसाने शांत बसू नका, ठाण्यात जे उदाहरण घडलं ते उदय तुमच्या सोबत देखील घडू शकेल. आम्ही मतांसाठी लाचार नाही. मराठी माणसांवर कोणी हात उचलेल तर ते सहन करणार नाही. अशी घटना पुन्हा घडण्यापूर्वी यांना वेळीच ठेचणार असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.

धक्कादायक म्हणजे यावर शिवसेनेने निवडणूक असल्याने गुळगुळीत भूमिका घेतली असून सर्व विषय पोलिसांवर वर्ग केला आहे. मात्र मराठी माणसाच्या जन्मलेली शिवसेना असं भाषणात असून ठाणे आणि मुंबईतील गुजराती आणि उत्तर भारतीय मतांसाठी शिवसेना नेहमीच लोटांगण घालत असल्याचं अनेकवेळा पाहायला मिळालं आहे. शिवसेनेचे ठाण्यातील पदाधिकारी नरेश म्हस्के यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून शिवसेना निवडणुकांमुळे गुळचट भूमिका घेऊन, मतांसाठी नेहमीच मराठी माणसाला एकटं पडल्याचं हे अजून एक उदाहरण समोर आलं आहे. सदर गुजराती व्यक्तीला कचाट्यात न पकडता त्याला ‘प्रवृत्ती’ असं टॅग देऊन, मराठीपणावर साधं बोट देखील नरेश म्हस्के यांनी ठेवलं नाही आणि निवडणुकीच्या प्रवृत्तीने राजकीय टिपणी केल्याचं स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, राहुल पैठणकर यांना मारहाण करणाऱ्या हसमुख शाहा याला महाराष्ट्र सैनिकांनी चोप दिला आहे. तसेच महाराष्ट्रात फक्त मराठी असा संदेश देखील देत मनसेने आम्ही मतांसाठी लाचार नाही असं देखील म्हटलं आहे. दरम्यान याच मतदारसंघातील भाजपचे आमदार हे स्वतः मराठी ब्राह्मण असून देखील मागील काही दिवसांपासून मूग गिळून शांत बसले आहेत. ज्यांच्या मतांवर निवडून येत आहेत त्यांनाच अडगळीत टाकून ते गुजरात्यांचे कैवारी झाल्याची टीका स्थानिक करत आहेत.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x