15 October 2019 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
#VIDEO: सांगली-कोल्हापूरचा महापूर आणि मनसेचं हे योगदान चंद्रकांत पाटलांचे डोळे उघडेल? सविस्तर भाजपच्या प्रचार पोवाड्यात महाराजांचा पुतळा राष्ट्रवादीने उभारलेला अन मेट्रो काँग्रेसच्या काळातील तरुणांमध्ये बँकिंग क्षेत्र आणि सरकारी नोकरीप्रति अधिक आकर्षण: ओलिवबोर्डच सर्वेक्षण नारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन VIDEO: राज ठाकरेंचा दावा सत्य! टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं वचन उद्धव ठाकरेंनी दिलेलं; त्याचा हा पुरावा आदित्य ठाकरेंचं 'केम छो' नंतर 'अय्यो लुंगी', मतांसाठी 'लुंगी हटाव' नाही तर 'लुंगी पहनों' धक्का! नाशिकमधील भाजप-शिवसेनेतील युती तुटली
x

अनधिकृत बांधकाम; शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक

Shivsena, Udhav Thackeray

मीरारोड : एका स्थानिक घराची बेकायदा उंची वाढवण्याच्या कामाची तक्रार करु नये म्हणून तक्रारदाराकडे २५,००० रुपयांची मागणी स्थानिक शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर याने केली होती. अखेर 10 हजारांवर तडजोड झाली आणि ती रक्कम मध्यस्थामार्फत घेतल्याप्रकरणी त्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यस्थासकट अटक केली आहे.

मीरारोड येथील मुशी कंपाउंडमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सूर आहे. त्यापैकीच एका घराची उंची बेकायदापणे वाढवल्याप्रकरणी तक्रार करू नये म्हणून स्थानिक शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर याने २५,००० रुपयांची मागणी केली होती. ज्यावर १०,००० रुपयांवर तडजोड करण्यात आली होती. त्यानुसार ठरलेली रक्कम सोमवारी रात्री मध्यस्त गोरखनाथ ठाकूर शर्मा यांच्या मार्फत स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा आडनाईक यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली आहे. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत कमलेश भोईर प्रभाग क्रमांक १५ मधून शिवसेनेतून निवडून आला होता. त्यामुळे शहरात शिवसेनेची नाचक्की झाली आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(615)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या