14 December 2024 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

पक्षप्रमुख अयोध्याला असताना अनेकांचा सेनेला राम-राम करत शिवसंग्राममध्ये प्रवेश

बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला राम राम करत शिवसंग्राम पक्षाचा भगवा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला जयमहाराष्ट्र करताना पक्षाचे विधानसभा प्रमुख सुदर्शन धांडे यांनी “शिवसैनिक वाघांनो सावकारकीसाठी स्वत:चा वापर होऊ देऊ नका, एवढीच अपेक्षा” ही समाज माध्यमांवर टाकलेली पोस्ट खूप काही सांगून जाणारी आहे.

काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेने सचिन मुळूक तसेच कुंडलिक खांडे यांच्यावर जिल्हाप्रमुख सारख्या महत्वाच्या पदांची जवाबदारी दिली होती. सचिन मुळूक यांच्याकडे केज, माजलगाव आणि परळी या महत्वाच्या ३ मतदार संघाची जवाबदारी आणि कुंडलिक खांडे यांच्याकडे पक्षाचे बीड, गेवराई आणि आष्टी ३ प्रमुख मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर, काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख, विधानसभा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख आदी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली आणि स्थानिक राजकारणाला सुरुवात झाली झाली. त्यात अनेक जुन्या आणि कट्टर शिवसैनिकांनी समाज माध्यमांवर तिखट भावना व्यक्त करायला सुरुवात केली होती.

दरम्यान, शिवसेनेने ” पहिले मंदिर फिर सरकार’ चा नारा देत अयोध्येवर कुच केली. मागच्या तीन दिवसांपासून विविध माध्यमांवर शिवसेनेचीच चर्चा आहे. या मोहिमेत दोन्ही जिल्हा प्रमुखांसह जिल्ह्यातील इतर प्रमुख पदाधिकारीही या मोहिमेत सहभागी झाले. शनिवारी उद्धव ठाकरेंनी शरयु नदीतीरी आरती करतेवेळी जिल्ह्यातील मंदिरांतही शिवसैनिकांनी आरतीचा गजर केला.

विशेष म्हणजे अयोध्येला दौऱ्यावर गेलेले स्थानिक पदाधिकारी तेथील फोटो सोशल मिडीयावर शेअर होत असताना माजी शहरप्रमुख, पक्षाचे बीड नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राहिलेले आणि सध्या विधानसभाप्रमुखपदाची जबाबदारी असलेल्या सुदर्शन धांडे यांनी “अखेरचा जय महाराष्ट्र’ म्हणण्याबरोबच “शिवसैनिकांनो सावधान सावकारकीसाठी स्वत:चा वापर होऊ देऊ नका, एवढीच अपेक्षा’ अशी पोस्ट टाकून शिवसेनेतील खदखद जाहीर केली होती. बीडमध्ये पक्षविस्तार करण्यासाठी सरसावलेल्या पक्ष नैतृत्वाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच इंगा दाखवल्याचे स्थानिक लोकं बोलत आहेत.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x