12 October 2024 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

सिंधुदुर्ग दौरा | जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी गेले आणि कार्यकारिणी बरखास्तीची वेळ, मुंबईतील कार्यकर्त्यांच्या भरोसे सिंधुदुर्ग दौरा

Raj Thackeray

Raj Thackeray | राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. कालपासून सिंधुदुर्गातून दौऱ्याला सुरुवात झाली. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे संवाद साधणार होते. सिंधुदुर्गातील संघटनात्मक बांधणीसाठी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक होती. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळी बाळा नांदगावकर, अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेते उपस्थित होते. मनसेची भाजपसोबतची जवळीक पाहता त्यांच्यामध्ये कोकणातील राजकारणावरही परिणाम होईल असं वाटलं होत, पण कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावालाच आहे याचं जिवंत उदाहरण समोर आलं आहे. कारण, पक्षाध्यक्ष स्वतः जिल्ह्यात आलेले असताना पदाधिकारी न फिरकल्याने मोठी चर्चा सुरु झाली आहे. अनेकांना याबद्दल माहितीच नाही अशी उडवाउडवीची कारण दिली जातं असली तरी याबद्दल प्रसार माध्यमांवर वृत्त सुरु असताना मनसेने दिलेली कारणं न पटणारी आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त
कोकण दौऱ्यात राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती चक्क कार्यकर्त्यांनाच माहीत नसल्याचा सांगण्यात आलं आहे. या दौऱ्याची माहिती ८ ते १० दिवस आधीच देण्यात आली होती, तरीही बऱ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. अनेकांना या बैठकीची माहिती आज सकाळी कळाली. परिणामी राज ठाकरे आणि अमित ठाकरे या बैठकीला गैरहजर राहिले. या घटनाक्रमानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मदतीने पुढील दौरा – नांदगावकर
माहिती देताना नांदगावकर पुढे म्हणाले, “आम्ही आज देवगड, कणकवली आणि वैभववाडीची कार्यकारिणी बैठक घेतली. या बैठकीची माहिती राज ठाकरेंना दिली. त्यानंतर राज ठाकरेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची सर्व कार्यकारिणी बरखास्त केली. यानंतर मुंबईत वेगवेगळ्या पदावर काम करणारे १०० कार्यकर्ते याठिकाणी आले आहेत. त्या सर्वांवर राज ठाकरेंनी जबाबदारी दिली आहे. या कार्यकर्त्यांच्या मदतीने पुढील दौरा पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन कार्यकारिणीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मतभेद
स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये असलेला मतभेद आमच्यासाठी काही प्रमाणात घातक ठरत आहे. ते निदर्शनास आल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत गटबाजी दिसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. आणखी खूप महिला-पुरुष आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत. त्यांना संधी द्यायला हवी. कोकणातील कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी असली तरी राज ठाकरे आपला कोकण दौरा पूर्ण करणार आहेत” असंही नांदगावकर म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS Chief Raj Thackeray on Sindhudurga district tour check details on 02 December 2022.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x