23 April 2025 10:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल HDFC Mutual Fund | पगारदार महिना केवळ 1,000 रुपये SIP वर मिळवत आहेत 2 कोटी रुपये परतावा, बिनधास्त पैसा कमवा Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 24 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत; मार्केट तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN
x

उद्धव ठाकरेंची आजारावरून नक्कल, सुषमा अंधारेंनी सभा गाजवत राज ठाकरेंचा मुद्देसूद 'राजकीय बँड' वाजवला

Sushma Andhare

Sushma Andhare | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेची सभा मुलुंडमध्ये झाली. यावेळी त्यांनी भाजप, शिंदे गटासह मनसेवर टीका केली. उठ दुपारी अन् घे सुपारी असा त्यांचा कार्यक्रम असतो अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. एकूण सुषमा अंधारेंनी या सभेत मुद्देसूद राज ठाकरेंच्या राजकारणाची पिसं काढल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे राज ठाकरेंवरील टीकेला उपस्थितांनी तुफान प्रतिसाद दिल्याचं देखील पाहायला मिळालं. मात्र यापुढे राज ठाकरेंनी किंवा मनसे नेत्यांनी अधिक राजकीय आगाऊपणा केल्यास सुषमा अंधारे अजून तुफान हल्ला चढवतील असं देखील दिसू लागलंय.

उद्धव ठाकरेंच्या आजारपणावरून टीका :
मुंबईतल्या नेस्को मैदानावर गटाध्यक्षांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून तसंच अकार्यक्षमतेवरून निशाणा साधला होता. राज ठाकरेंनी केलेल्या त्या टीकेला सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलंय.

उठ दुपारी अन् घे सुपारी
राज ठाकरेंवर बोचरी टीका करताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, “आमच्याकडे एक असा माणूस आहे पठ्ठ्या.. उठ दुपारी अन् घे सुपारी असा त्यांचा कार्यक्रम असतो. याला थोडं बोलेन, त्याला थोडं बोलेन, काही वेळासाठी विचारवंत होईल, मध्येच मिमिक्री कलाकार होईल असा त्यांचा कार्यक्रम असतो.

मध्येच मिमिक्री आर्टिस्ट, मध्येच पेंटरही होईन :
दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं, असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली.

मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा
ते म्हणाले की, मतदार नसलेली सेना. मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा आणि काय होतं पाहा. मतदारमधील ‘म’, नसलेलीमधील ‘न’ आणि सेनेमधील ‘से’ काढला की काय होतं? मी काहीच म्हणत नाही. मी अतिशय गरीब लेकरू आहे, त्यात अजिबात पडत नाही,” असं अंधारे यांनी म्हटलं. आता मतदार नसलेल्या सेनेचा उमेदवार नसलेली सेना इथपर्यंत प्रवास झाला आहे. अशी परिस्थिती होऊनही त्यांना बोलावंसं वाटतं,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena leader Sushma Andhare target MNS Chief Raj Thackeray in Mulund rally check details on 02 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sushma Andhare(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या