19 July 2019 9:46 AM
अँप डाउनलोड

काश्मीरमधून कलम ३७० हटवाच, शिवसेनेची आग्रही मागणी

काश्मीरमधून कलम ३७० हटवाच, शिवसेनेची आग्रही मागणी

मुंबई : एनडीए’चा केंद्रातील सहकारी पक्ष शिवसेनेने पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधून कलम ३७०हटवण्याची मागणी सामना वृत्तपत्रातून केली आहे. तसेच काश्मीरच्या समस्येचं मूळ हे काश्मीरमध्येच आहे, पाकिस्तानात नाही असं देखील नमूद केलं आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट अजून ६ महिन्यांनी वाढवण्याच्या निर्णयाचे देखील समर्थन करण्यात आले आहे. तसेच काश्मीरमधला मुख्य मुद्दा तिथल्या निवडणुका नसून तर कलम ३७० हटवणे आहे असे देखील शिवसेनेने मुखपत्रातून म्हटलं आहे. दरम्यान सामनाच्या अग्रलेखातून मेहबुबा मुफ्ती आणि फारूख अब्दुल्ला या दोन नेत्यांवर देखील सडकून टीका करण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यावरून एकप्रकारे मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देखील अप्रत्यक्ष लक्ष करण्यात आलं आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने हे आश्वासन देखील दिल होतं आणि आता ५ वर्ष देशावर राज्य केल्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकार पुन्हा बहुमताने सत्तेत विराजमान झालं आहे. त्यामुळे अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच कलम ३७० करून पुन्हा राजकारण सुरु झालं आहे.

काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचा दौरा केला होता. त्यानंतर पुन्हा कलम ३७० हटवण्यावरून जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेने पुन्हा हा विषय उचलून धरला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात, केंद्रीय गृहखात्यातून नेमक्या कोणत्या हालचाली सुरु होतात का ते पाहावं लागणार आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Shivsena(483)#udhav Thakarey(375)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या