8 May 2024 9:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

आमच्या लाखो युजर्सना त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत: फेसबुक

Facebook, mark zuckerberg, Instagram, Whatsapp, Social Media

मुंबई : समाज माध्यम आज प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनले आहेत आणि त्यात फेसबुक, व्हॉट्स अँप आणि इंस्टाग्राम हे सर्वप्रथम डोळ्यासमोर येतंच. परंतु काल म्हणजे बुधवारी दुपारपासून या सर्व सेवांचा वेग अत्यंत मंदावला होता आणि लाखो वापरकर्त्यांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला होता. नेटकऱ्यांना फेसबुक, ट्विटर, व्हॉटस् अँप वापरताना प्रचंड अडचणी येत होत्या. काल फोटो आणि व्हिडिओ पाठवताचा वेग कमालीचा संथ झाला होता. या सगळ्याबाबत आता फेसबुकने चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्या लाखो युजर्सना जो प्रचंड त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करत आहोत असं फेसबुकने ट्विटकरून म्हटलं आहे.

देशभरात बुधवारी अनेक सामान्य नागरिकांनी मग ते व्यवसाय किंवा नोकरी क्षेत्रातले असोत किंवा इतर क्षेत्रातले त्यांना फेसबुकचा वेग मंदावलेला जाणवत होता. ते जेव्हा इमेजेस किंवा व्हिडिओ सर्कलमधील मित्र मंडळींना पाठवत होते, त्यावेळी हा वेग कमालीचा मंदावला होता. मोबाईलवरच्या फेसबुक अँपल अडचणी येत होत्या. परंतु अडचण ध्यानात येताच आमची टीम ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत होतो आणि आता ही समस्या पूर्णपणे सोडवली आहे. बुधवारपासून जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो, असं फेसबुकने ट्विटर द्वारे म्हटलं आहे.

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्स अँप या तिन्हीचा वेग बुधवारी दुपारपासून मंदावला होता. दुपारी २.४९ पासून ही अडचण जाणवू लागली होती. व्हिडिओ पोस्ट न होणे, इमेज डाऊनलोड न होणे या समस्या भेडसावत होत्या. यामागचे कारणही स्पष्ट करण्यात आले नव्हते. आता या सगळ्याबाबत फेसबुकने माफी मागितली आहे.

हॅशटॅग्स

#facebook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x