14 November 2019 1:11 PM
अँप डाउनलोड

चाहत्यांना धडे, सोशल मीडियावर नम्रपणे उत्तर द्या

नवी दिल्ली : २०१४ मधील भाजपला मिळालेल्या यशानंतर त्यांचे चाहते समाज माध्यमांवर इतके उर्मट झाले की, प्रत्येकाला वेड्यात काढणे हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम सुरु होता. समाज माध्यमांवर असणारा प्रत्येकजण त्यांना काँग्रेस समर्थक आहे असच एकूण प्रतिक्रिया देताना कल असतो. त्याचाच दुसरा परिणाम असा झाला की भाजपची समाज माध्यमांवर प्रतिमा डागाळण्यास ते एक कारण झालं.

ज्या समाज माध्यमांनी भाजप सरकार सत्तेत येण्यास मोठी भूमिका बजावली होती तेच समाज माध्यम भविष्यात भाजपचा देशभरात पराभव होण्यास कारणीभूत ठरेल याची भाजपच्या वरिष्ठांना चुणूक लागली असावी. त्याचाच भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी समाज माध्यम हाताळणाऱ्या भाजपच्या ३०० कार्यकर्त्यांची चांगलीच शाळा घेतल्याचे समजते.

या पुढे समाज माध्यमांवर आक्रमक प्रतिक्रिया न देता नम्रपणे उत्तर कस देता येईल या बाबत धडे देण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांचा समाज माध्यमांवरील अतिउत्साह अंगलट येऊन लोकांच्या मनात भाजप प्रति रोष वाढत असल्याचं त्यांच्या कानावर आल्याने हे धडे दिले जात असल्याचे समजते. समाज माध्यमांचा उपयोग भाजपची प्रतिमा मोठी करण्यासाठी करा असा संदेश कार्यकर्त्यांना देण्यात आला.

भाजपच्या या कार्यशाळे मुळे भाजप देशातील राजकारणातच नव्हे तर समाज माध्यमांवर सुद्धा बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. बहुतेक संपर्क फॉर समर्थन आता समाज माध्यमांवर सुद्धा भाजप कडून अंमलात येतंय का असं एकूण चित्र आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(175)BJP(415)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या