Viral Video | गेल्या 2 वर्षांपर्यंत आपण वाहने रस्तावरून धावताना पाहिली आहेत मात्र, या दोन वर्षांच्या काळानंतर परिस्थिती एवढी बदललेली आहे की विमाना प्रमाणे टॅक्सी आणि कार हवेत उडताना दिसत आहेत. मात्र खऱ्या आयुष्यातही असंच काहीसं पाहायला मिळणार आहे. कारण, दुबईमध्ये फ्लाइंग टॅक्सीची चाचणी घेण्यात आली असून, आकाशामध्ये उडणारी टॅक्सी पाहून लोकांचे डोळे पाणावले आहेत. कारण आता या संपूर्ण दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती व्हायरल होत आहे.

फ्लाइंग टॅक्सी व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, या फ्लाइंग टॅक्सीची दुबईमधील चिनी तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Xpeng ने चाचणी घेतली आहे. यावेळी चाचणी दरम्यान कंपनीने एक्स 2 फ्लाइंग कारचे यशस्वी उड्डाण केले आण या दोन आसनी टॅक्सीचा वेग ताशी 130 किमी असणार आहे. तसेच ही उडणारी कार पूर्णपणे इलेक्ट्रिक असून शून्य कार्बन उत्सर्जित करते आणि हे इलेक्ट्रिक वाहन टेक ऑफ आणि लँडिंग सुविधांनी सुसज्ज आहे. तर यात बुद्धिमान उड्डाण नियंत्रण प्रणालीसह स्वायत्त उड्डाण क्षमता देखील बसवण्यात आल्या आहेत.

टॅक्सीचे हवेमध्ये टेक ऑफ
असे ही समोर येत आहे की, कार टेक-ऑफवर 500 किलो पर्यंत भार उचलू शकते आणि त्यात आठ प्रोपेलर बसविण्यात आले आहेत. तसेच हे उड्डाण मानवरहित होते आणि यामध्ये हे लक्षात घेण्यासारखे आहे की कारची आतापर्यंत फक्त चाचणी घेण्यात आली आहे. या कारला सेवेमध्ये येण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. पण, या टॅक्सीबाबतही लोक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत आणि काही सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ हा व्हिडिओच नाही पण लोक आपापल्या शैलीमध्ये प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही लोक सोशल मीडियावर याचे कौतुकही करताना दिसत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Air Taxi Video Viral Checks details 15 October 2022

Viral Video | दुबईमध्ये इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी हवेत उडू लागली राव, आपण बसलोय ट्राफिकमध्ये भाडं वाढवत