Viral Video | मुंबईतील हिंदू-मुस्लिम दंगलीत सर्व हिंदू तसेच मराठी माणूस आणि स्वतः चंद्रकांत पाटील सुद्धा शिवसेनेमुळे वाचले, पहा व्हिडिओ
Minister Chandrakant Patil | मुंबईतल्या नेस्को मैदानावर काल शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी करत भाजप आणि शिंदे गटावर कडाडून टीका केली. एवढंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही त्यांनी टीका केली. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी नेस्को मैदानात भाषण करत तुफान टीका केली. एवढंच नाही तर ठाकरी शैलीत त्यांनी अमित शाह यांनाही आव्हान दिलं आहे.
शिवसेना संपवण्यासाठी सगळे एकमेकांच्या साथीने उभे राहिले आहेत. भाजपने मुन्नाभाईलाही सोबत घेतलं आहे. या उद्धव ठाकरेच्या विरोधात मोदी, शाह, भाजप आमचे गद्दार आणि मुन्नाभाई सगळे एकत्र आले आहेत. याचं कारण एकच आहे यांना शिवसेना आणि उद्धव ठाकरे तसंच ठाकरे घराणं संपवायचं आहे. मुंबईचा लचका यांना तोडायचा आहे. पण आज माझं या मैदानावरून अमित शाह यांना आव्हान आहे हिंमत असेल तर पुढच्या महिन्याभरात मुंबई महापालिका आणि विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना आव्हान दिलं आहे.
महाराष्ट्रातील वातावरण उद्योग-व्यापारासाठी सध्या निकोप नाही. महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त झाली. त्या खोक्यांची आता वसुली सुरू झाल्याने उद्योग व गुंतवणूकदारांची पळापळ सुरू आहे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाहीच, पण महाराष्ट्राला दुश्मन ठरवले जात आहे. महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान फडणवीस यांच्या समोर आहे. बाकी टक्केवारीचा नवा हिशेब घ्यायला शेलारांचे नियोजन मंडळ आहेच, असा टोलाही सेनेनं शेलारांना लगावला.
दरम्यान, हिंदुत्व आणि मराठी माणूस या विषयावरून सेनेला लक्ष करत असताना दुसऱ्या बाजूला भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे जुने व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागल्याने आता भाजपाची खिल्ली उडवली जातं आहे. हा व्हिडिओ आहे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा, ज्यामध्ये ते एका मुलाखतीत स्वतः मुंबईतील अनुभवातून शिवसेनेमुळे येथे हिंदू आणि मराठी माणूस कसा टिकून आहे याचा पाढा वाचताना दिसत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या सोयीस्कर भूमिका सुद्धा समोर येतं आहेत.
महाराष्ट्रातील आयटी सेल सदस्य याला आमदार की चे मानधन कमी पडत आहे,चाळीस पैश्यासाठी तगमग बघा…! @BhatkhalkarA जरा माजी भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारा मग आपल्या बालिश बुद्धी चे प्रदर्शन करा… https://t.co/MLW68BCwMk pic.twitter.com/AcoeAddOdy
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) September 21, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: BJP Leader Chandrakant Patil interview statement on Shivsena check details 22 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA