3 May 2025 2:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Video Viral | समोरून ट्रेन येतं असताना चिमुकला अचानक रेल्वे प्लॅटफॉर्मवरून पटरीवर पडला, देव वेगाने आला, पण त्या महिलेचं निरीक्षण करा

Child Fell On Railway Video Viral

Video Viral | आपण अनेकदा सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर चालतानाचे व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. अंगावर काटा आणणारे जिवघेणे व्हिडीओ पाहताना लोकंच्या मनामध्ये एक प्रकारची भिती निर्माण होते. प्लॅटफॉर्मवर चालताना, ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले जाते मात्र हलगरजी पणा मुळे लोकांना जिव सुद्धा गमवावा लागतो. कधी कधी एखादा प्रवासी घाईघाईने ट्रेनमधून उतरू लागतो किंवा चढायला लागतो, परिणामी या घटना घडतात. एवढेच नाही तर अनेक वेळा प्रवासी रेल्वे रुळावर पडतात मात्र, काही लोकांचे नशीब चांगले असेल तर ते वेळीच वाचतात. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडिओ अनेकदा शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मूल रेल्वे रुळावर पडतो आणि समोरून ट्रेन येते. एक माणूस तिथे पोहोचतो आणि त्याला मृत्यूच्या मुखातून परत आणतो, ज्याने हा व्हिडिओ पाहिला तो थक्क झाला आहे.

मूल रेल्वे रुळावर पडतो
हा व्हायरल व्हिडीओ कुठचा आहे, याची माहिती अध्याप मिळू शकलेली नाही. व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला एका लहान मुलासोबत प्लॅटफॉर्मवर चालताना दिसत आहे, व्हिडीओमध्ये असे दिसून येत आहे की, मुलाची आई अंध असावी. दोघेही हळू हळू पुढे सरकत आहेत, महिलेने मुलाला धरले आहे. पण, दोघेही फलाटाच्या काठावर पोहोचतात आणि पुढच्याच क्षणी मूल खाली रेल्वे रुळावर पडते. तेवढ्यात समोरून रेल्वे येते आहे. मुलाला वाचवण्यासाठी महिला जोरजोरात ओरडू लागते. मात्र, मुलाला वाचवायला कोणीच येत नाही. मूल स्वतःहून वर चढण्याचा प्रयत्न करते पण, तेवढ्यात समोरून एक व्यक्ती धावत त्या मुलाला वाचवण्यासाठी पोहोचते. त्या व्यक्तीकडे बघून एखाद्या चित्रपटात नायकाचा प्रवेश झाल्यासारखे वाटते, ती व्यक्ती ताबडतोब मुलाला उचलते आणि वर ठेवते आणि स्वतः वर चढते.

इंटरनेटवर व्हिडीओ झाला व्हायरल
धक्कादायक व्हिडिओ पाहून क्षणासाठी अंगावर काटा आला असेल पण त्या मुलाचे नशीब चांगले होते, अन्यथा परिणाम काहीही होऊ शकतो. हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोक त्या व्यक्तीची स्तुती करत आहेत आणि त्याला मसिहा देखील म्हणत आहेत. काही लोक माणसाची तुलना देवाशी करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nadim Khan (@nadim__khan_91)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Child Fell On Railway track but man shows courage video trending on social media checks details 08 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Child Fell On Railway Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या