1 May 2025 10:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

 Video Viral | होय ही कलाकाराची कला आहे, मुलगी नव्हे तिची थ्रीडी पेंटिंग आहे, थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल

Wall Painting Video Viral

 Video Viral | या जगामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रत्येक व्यक्ती ना व्यक्तीच्या अंगामध्ये काही ना काही तरी कला आहे. या या जगात प्रतिभावान लोकांची कमतरता नाही असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. तुमच्या आमच्या शेजारी कितीतरी प्रतिभावान लोक गल्लीत आणि परिसरात आढळून येतील, ज्यांचे कौशल्य पाहून तोंडात बोटे घालण्याची वेळ येते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडीओ जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की कला निर्जीवलाही सजीव करू शकते. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अशा प्रकारे आपले कौशल्य दाखवत आहे, जे पाहून तुम्ही अचंबित व्हाल. ही व्यक्ती रंग आणि ब्रशने 3D पेंटिंग बनवताना दिसत आहे.

रंग आणि ब्रशने काढले 3D पेंटींग
कला काय असते आणि ती काय करू शकते याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की ही एक प्रतिभावान व्यक्ती वास्तववादी 3D पेंटिंग बनवत आहे आणि जे पाहून लोकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. आपण सोशल मीडियावर कलाकारांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण असा कलाकार तुम्ही क्वचितच पाहिला असेल यामध्ये काही वाद नाही. या कलाकाराच्या हातात खरोखरच जादू आहे की काय असे वाटेल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बागेमध्ये 3D पेंटिंग तयार करणारा एक माणूस आहे जो प्रथम एका मुलीची कलाकृती नजरेमध्ये आणि त्या जागेवर आखून घेतो. ती व्यक्ती मुलीची थ्रीडी पेंटिंग बनवत आहे तर जेव्हा पेंटिंग तयार होते, तेव्हा खरी मुलगी कोणती आहे आणि रंगांनी कपडे घातलेली मुलगी कोणती हे ओळखने कठीण होईल.

यूजर्सची व्हिडीओला पसंती
या व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे. तर तुम्ही बघू शकता की तो कलाकार एका मुलीला बागेमध्ये बेंचवर बसवतो आणि त्यानंतर प्रथम त्या मुलीची रूपरेषा तयार करून घेतो पुढे तो आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज होतो. कलाकार व्यक्ती इतक्या जबरदस्त पद्धतीने आपली कला दाखवतो की, खरी मुलगी कोणती आणि चित्रातली कोणती हे समजणे कठीण आहे. जसजसे तुम्ही त्याचे कामबघाल, तेव्हा शेवटी तुम्हाला एक उत्कृष्ट नमुना दिसेल. त्याच्या कलेने तुम्ही शेवटपर्यंत मंत्रमुग्ध होऊन जाल, @MorissaSchwartz नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘युनिक’

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of 3D wall painting video trending on social media checks details 13 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या